लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : टिटवाळा येथील एका तरूणाचे जातीबाह्य मुलीबरोबर पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. मुलगी या मुलाशीच विवाह करण्याच्या विचारात असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाचे अपहरण केले. त्याला भिवंडी जवळील पडघा येथील जंगलात नेऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी सकाळी ही घटना कल्याण-टिटवाळा रस्त्यावरील वडवली येथील उड्डाण पुलावर घडली आहे. या प्रकरणात पुष्पराज राहुल जाधव या तरूणाने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुष्पराजचा अल्पवयीन भाऊ हा गंभीर जखमी झाला आहे. अल्पवयीन मुलाचे आणि संबंधित मुलीचे प्रेम संबंध होते. या प्रकरणात नीतेश जाधव, परेश ठाकरे, पंकज आणि इतर तीन जणांना आरोपी करण्यात आले आहे.

आणखी वाचा-फलकबाजीमुळे डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण, रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांकडून कचरा

पोलिसांनी सांगितले, अल्पवयीन मुलाचे आणि एका मुलीचे प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध जातीबाह्य असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी या प्रेमसंबंधांना विरोध केला होता. तरीही मुलगी या मुलाच्या संपर्कात होती. याचा राग कुटुंबीयांना होता. गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात मुलगा शिक्षण घेतो. मुलीला मुलापासून अलिप्त करण्याचे प्रयत्न सुरू होते.

सोमवारी सकाळी ११ वाजता तक्रारदार पुष्पराज जाधव, त्याचा अल्पवयीन प्रेमसंबध प्रकरणातील भाऊ, समीत मगर, मुबीन मणियार, प्रणव भोईर हे शुभम तरे याची स्वीफ्ट डिझायर कार घेऊन कल्याणला बर्गर खाण्यासाठी चालले होते. वडवली उड्डाण पुलावरून जात असताना पुष्पराज याच्या मोटारी समोर एक मोटार आडवी येऊन उभी राहिली. त्याचवेळी पाठीमागील भागात एक मोटार उभी करण्यात आली.

आणखी वाचा-ठाण्यात ‘ग्रँड सेंट्रल पार्क’ ची उभारणी; काश्मीरच्या मुघल गार्डनसह चिनी, मोरोक्कन, जपानी संकल्पनेवर उद्याने

आपणास कोणीतरी आडवे आले म्हणून तक्रारदार थांबला. त्यावेळी समोरील वाहनातून आरोपी नीतेश जाधव उतरले. त्यांनी प्रेमसंबंध प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने खाली उतरवले. त्यांच्या मोटारीत बसविले. आमचे सगळ्यांचे मोबाईल आरोपींनी काढून घेतले. अल्पवयीन मुलासह सर्वांना पडघा येथील जंगलात नेले. तेथे प्रेमसंबंधातील मुलाला बेदम मारहाण करून त्याला जखमी करण्यात आले. आरोपीने जातीवाचक भाषा करून तक्रारदार आणि त्याच्या साथीदारांना सोडले. मुलीबरोबर पुन्हा प्रेमसंबंध ठेऊ नकोस, असा इशारा तक्रारदारांना देण्यात आला. पडघा येथून निघाल्यावर पुष्पराज जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.