कल्याण – येथील पूर्व भागातील मलंगगड रस्ता भागातील एका सोसायटीत राहत असलेल्या २३ वर्षांच्या पतीने आपल्या १९ वर्षांच्या पत्नीला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही महिला थोडक्यात बचावली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार पतीचा शोध सुरू केला आहे. मागील दहा दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे.

पोलीस उपनिरीक्षक जी. आर. बाबडे यांनी सांगितले, तक्रारदार पत्नी तनीषा खुशाल जाधव (१९), पती खुशाल बाजीराव जाधव (२३) कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्ता भागातील स्काय ॲम्बीयन्स सोसायटीत राहतात. खुशालची नोकरी गेल्याने तो बेरोजगार आहे. त्याची पत्नी तनीषा नोकरी करत होती. तिचीही नोकरी गेली आहे. ती पतीला घरगाडा चालविण्यासाठी नोकरी शोध म्हणून सतत तगादा लावत होती. यावरून दोघांच्यात भांडण होत होते.
१६ ऑक्टोबर रोजी तनीषा स्वयंपाक घरात काम करत होती. तिने पतीला घराच्या ओटीवर असलेला स्टूल सज्जामध्ये आणून ठेवा, अशी सूचना केली. त्यावेळी पती खुशाल घरात बसले होते. तनीषाने स्टूल आणण्याची सूचना केल्यावर खुशालने मी निवांत बसलो की तू मुद्दाम काम सांगून त्रास देतेस. मी निवांत बसलेले तुला पाहवत नाही, असे बोलून तनीशाबरोबर वाद उकरून काढला. पत्नीला त्याने ठोशाबुक्क्याने मारहाण करत आज तुला मी जिवंत सोडणार नाही, असे बोलत खुशालने घरातील नायलाॅनची दोरी घेऊन ती शय्यागृहाच्या छताच्या पंख्याला बांधली.

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement
“नियतीचा खेळ” पत्नीच्या आजारपणामुळे लवकर रिटायरमेंट घेतली, पण निरोप समारंभातच तिने साथ सोडली; VIDEO पाहून धक्का बसेल

हेही वाचा – ३.४० ला लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान’चा आधार; जाणून घ्या कसे काढावे घर बसल्या आयुष्मान कार्ड?

पत्नीला स्वयंपाक घरातून ओढून आणून तिला स्टुलवर चढून पंख्याची दोरी खुशालने तिच्या गळ्यात अडकवली. पत्नीच्या पाया खालील स्टुल काढून घेऊन तिला गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केला. दोरीचा गळफास लागताच पत्नीचा श्वास कोंडला. ती प्राण सोडत नाही म्हणून खुशालने तिचे पाय पकडून तीन वेळा तिला फास घट्ट लागण्यासाठी वर खाली ओढले. पत्नीने मानेजवळची दोरी हाताने घट्ट पकडून ठेवली असल्याने ती थोडक्यात बचावली. पंख्याचा फास तोडून तनीषा खाली उतरली. तिच्या मानेला फासाचे ओरखडे उमटले होते.

हेही वाचा – थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती

या घटनेनंतर तनीषा जळगाव येथील माहेरी काही धार्मिक कार्यक्रमासाठी निघून गेली. तेथे नातेवाईकांनी तिच्या मानेवरील पट्टे पाहिले. तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांच्या सांगण्यावरून तनीषाने जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार तेथून मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तनीषा जळगावहून परतल्यावर तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फरार पतीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तो जळगाव येथून पळून गेला असावा असा संशय पोलिसांना आहे.

Story img Loader