ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात अमली पदार्थाचा व्यवसाय बंद केल्याने रेहान उर्फ पसीच (२०) याने एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा >>> वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाने देणग्यांची नियमबाह्य वसुली; देणगी वसुलीसाठी तोतया कार्यकर्तीचा डोंबिवलीत संचार

हेहा वाचा >>> कल्याण: बडोदा बँकेचे बनावट संकेतस्थळ बनवून कल्याण मध्ये वकिलाची फसवणूक

अमृतनगर येथील भीमवाडी परिसरात रेहान हा अमली पदार्थ विक्री करत असे. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर रोशन शेख आणि परिसरातील नागरिकांनी त्याचा हा व्यवसाय बंद केला होता. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री रोशन हे परिसरातून पायी जात असताना रेहान हा त्याठिकाणी आला. त्याने रोशन यांच्या खिशातील १८ हजार ६३० रुपये काढून घेतले. तसेच अमली पदार्थाचा व्यवसाय बंद पाडल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी रोशन यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रेहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Story img Loader