पाणीपुरी खाण्यास पैसे दिले नाही म्हणून एकाला जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी कळवा येथे उघडकीस आला. समीर अन्सारी (३५) असे जखमीचे नाव आहे. तर याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अजय लाडे उर्फ ब्याव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>ठाणे: लैंगिक अत्याचारामुळे तरुणीची आत्महत्या

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं

कळवा येथील महात्माफुले नगर परिसरात समीर राहतात. ते परिसरात मजुरी करतात. रविवारी सायंकाळी ते घराच्या दिशेने जात असताना अजय लाडे याने त्यांना शिवीगाळ करत पाणीपुरी खाण्यास पैसे मागिण्यास सुरूवात केली. समीर यांनी पाणीपुरी खाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला असता, अजय याने त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्याच्या हातातील एका टोकदार वस्तूने डोक्यात वार केला. त्यामुळे समीर यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणात अजयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader