ठाणे : करोना काळात महाविकास आघाडीचे तेव्हाचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित असलेले लोकनाथ- एकनाथ हे गाणं राज्यभर भलतच गाजलं. त्यानंतरच्या काळात शिंदे यांच्या राज्यस्तरीय लोकप्रियतेसाठी या गाण्याचा पुरेपुर राजकीय वापरही करण्यात आला. पुढे शिवसेनेत मोठं बंड घडले आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्यावर लिहले गेलेले आणि संगीतबद्ध केलेले ‘अनाथांचा नाथ’ हे गाण चर्चेत आले. एकनाथ शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षाच्या राजकीय प्रवासात अत्यंत महत्वाचे ठरलेल्या या दोन्ही गाण्यांची ध्वनिचित्रफित त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन: प्रकाशित केली जाणार आहेत. या दोन गाण्यांसोबत ‘एकनाथ तू लोकनाथ तू’ हे नवं गाणंही प्रकाशित केले जाणार असून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या गाण्यांचे लेखन केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्यावर लिहल्या गेलेल्या गाण्यांची विशेष भूमिका राहिली आहे. करोना काळात नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी केलेल्या कामाचे दखल घेणारी अनाथांचा नाथ या गाण्याच्या ध्वनिचित्रफिती प्रकाशित झाली होती. या गाण्यास प्रचंड लोकप्रियता मिळाली. शिंदे यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा छाप पाडणारी अशी ही गाणी असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेव्हा पंतप्रधान म्हणुन पदभार स्विकारला त्यावेळी सिंग इज किंग हे गाणे भलतेच व्हायरल होत होते. त्याचप्रमाणे शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जुन्या गाण्यांच्या ध्वनिचित्रफिती पुन: प्रकाशित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी ‘एकनाथ तो लोकनाथ’ हे नवे गाणेही प्रदर्शित होणार असून, या गाण्याचे लेखन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. शिंदे यांचा राजकीय प्रभाव वाढवण्यात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांची लोकप्रियता टिकवण्यात या गाण्यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या प्रकाशनाला राजकीय महत्त्व लाभणार आहे. नव्या गाण्यात शिंदे यांच्या नेतृत्वाचा नवा पैलू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अनाथांचा नाथ एकनाथ हे गाणे शिंदे यांच्या वाढदिवसाच्या म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित करण्यात आले होते. या गाण्याचे लेखन ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तथा लेखक संदीप माळवी यांनी केले आहे. तर गायक अवधूत गुप्ते यांनी गायन केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून कार्यकता म्हणून सुरू झालेला प्रवास, त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत, जनतेसाठी काम करण्याची इच्छा उराशी बाळगून, जनतेची तसेच महाराष्ट्राची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या आणि ठाणे जिल्ह्याला प्रगतीपथावर नेणारा एकनाथ शिंदे यांचा प्रवास संगीतबद्ध करण्यात आला आहे.
लोकनाथ- एकनाथ हे गाणे १५ फेब्रुवारी २०२२ ला प्रकाशित करण्यात आले होते. याचे लेखनही संदीप माळवी यांनी केले आहे. तर याचे गायन गायक अवधूत गुप्ते, शंकर महादेवन आणि महालक्ष्मी अय्यर यांनी केले आहे. या गाण्याच्या माधघ्यमातून समृद्धी महामार्ग, कोकण एक्सप्रेस, सागरी किनारपट्टी, क्लस्टर अशा विविध विकासकामांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे यांचे ‘लाडकी बहिण माझी लाडका युवा, सगळ्यात पुढे हवा शेतकरी माझा – एकनाथ’ हे गाणे देखिल जाहिरातीच्या माध्यमातून दाखवण्यात येत होते.
लोकनाथ एकनाथ आणि अनाथांचा नाथ या गाण्यांच्या ध्वनिचित्रफितीतील जुने व्हिज्युअल बदलून शनिवारी होणाऱ्या आनंदोत्सव कार्यक्रमात ही गाणी नव्याने प्रकाशित केली जाणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘एकनाथ तू लोकनाथ तू’ हे नवीन गाणे देखिल यावेळी प्रदर्शित होणार आहे. – संदीप माळवी, लेखक तथा ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त