ठाणे : करोना काळात महाविकास आघाडीचे तेव्हाचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित असलेले लोकनाथ- एकनाथ हे गाणं राज्यभर भलतच गाजलं. त्यानंतरच्या काळात शिंदे यांच्या राज्यस्तरीय लोकप्रियतेसाठी या गाण्याचा पुरेपुर राजकीय वापरही करण्यात आला. पुढे शिवसेनेत मोठं बंड घडले आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्यावर लिहले गेलेले आणि संगीतबद्ध केलेले ‘अनाथांचा नाथ’ हे गाण चर्चेत आले. एकनाथ शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षाच्या राजकीय प्रवासात अत्यंत महत्वाचे ठरलेल्या या दोन्ही गाण्यांची ध्वनिचित्रफित त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन: प्रकाशित केली जाणार आहेत. या दोन गाण्यांसोबत ‘एकनाथ तू लोकनाथ तू’ हे नवं गाणंही प्रकाशित केले जाणार असून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या गाण्यांचे लेखन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा