महापालिका हद्दीत असले तरी दिव्याला प्रशासनाकडून कायम सापत्नपणाची वागणूक मिळाली आहे. त्याचे ठळक उदाहरण म्हणजे परिवहन सेवा. महापालिकेच्या परिवहन सेवेने अद्याप दिव्यात प्रवेशही केलेला नाही. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीसाठी  दिवेकरांना रिक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. मक्तेदारी असल्याने दिव्यातील रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. प्रवाशांना चक्क त्यांना विनवण्या कराव्या लागतात. वाहतूक विभाग तसेच आरटीओच्या दुर्लक्षामुळे या भागात अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट आहे. केवळ नाईलाज असल्याने दिवेकरांना हा धोक्याचा प्रवास करावा लागत आहे.

दिवा परिसरामध्ये हजारो रिक्षा असल्या तरी त्यांची निश्चित आकडेवारी ना रिक्षा संघटनांकडे आहे, ना वाहतूक पोलिसांकडे. या भागातील केवळ ५० ते ६० रिक्षाचालकांकडे आरटीओचे परवाने असून उर्वरित सगळा कारभार हा अनधिकृतच आहे. दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला हे रिक्षा थांबे असून शेअर पद्धतीनेच येथे रिक्षा मिळते. शेअर रिक्षांमध्येही केवळ तीन प्रवाशांच्या जागेमध्ये सहा-सहा जणांचा कोंबून प्रवास करावा लागतो. ठरलेल्या मार्गाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जायचे असल्यास चालक सांगेल ते भाडे प्रवाशांना मोजावे लागते. अगदी हाकेच्या अंतरावरील शेअर प्रवासासाठीही प्रवाशांना चक्क १५ रुपये मोजावे लागतात. वेगळ्या मार्गावर जायचे असेल तर थेट शंभर रुपये सांगून प्रवाशांची अडवणूक केली जाते. दिवा शहरात पोलीस ठाणेच नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस फिरकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना त्यांच्या गैरकृत्याचा जाब विचारणारे इथे कुणीही नाही. त्यामुळे ते अधिकच मुजोर झाले आहेत.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी

रस्त्याची दुरवस्था..

अवघ्या काही वर्षांत दिव्याची लोकसंख्या झपाटय़ाने वाढली. मात्र त्या प्रमाणात रस्ते वाढले नाहीत. असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही. त्यांची डागडुजी झाली नाही. परिणामी सध्या दिवा शहरात चांगले रस्ते दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती आहे. रस्त्यावरील खड्डे, चिखल, दगडांमुळे वाहनांमधून गेले तरीही नागरिकांना पाठदुखीचा त्रास होतो. चालत जाण्याची तर कोणतीही सोय नाही. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था आहे.

Story img Loader