लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: मुंबई अहमदाबाद मार्गावर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गायमुख ते वसई पर्यंत वाहतूक कोंडी झाले आहे. शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बुधवारी पडलेल्या पावसामुळे अनेक मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. मुंबई अहमदबाद रोड मार्गावर कमरेपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहने या मार्गावर अडकून आहेत. साचलेल्या पाण्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. घोडबंदर मार्गावर गायमुख ते वसई येथील बापाणे पोलीस चौकी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे शक्य असल्यास या मार्गावरून वाहतूक टाळा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avoid travel on the ghodbunder route if possible water on road due to heavy rain mrj