ठाणे : ” महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे उद्योग ठाणे पोलिसांकरवी सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपल्या कार्यकर्तव्यानुसारच काम करावे. दबावाखाली येऊन कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे. पकडून आणून कोणालाही बसविणे, हे आपले काम नाही ” असा आशयाचा मजकूर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा – कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर आरोप केला आहे. तर २३ नोव्हेंबरच्या निकालानंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा जरा ” असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला आहे. तर तुम्ही सत्तेत असताना पोलिसांचा किती गैरवापर केला हे विसरलात का असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आव्हाडांच्या ट्विटला केले आहे.

विधानसभा निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरु असताना राजकीय व्यासपीठावरून आपल्या विरोधी उमेदवारावर सर्व नेते मंडळींकडून टीकांची झोड उठवली जाते. तर सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात राजकीय नेत्यांकडून एक्स या समाज माध्यमांवरून विविध महत्वाच्या विषयांबाबत आपली भूमिका मांडत असतात. याच पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर ट्विट करून आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड मुंब्रा – कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. तर आव्हाड आणि मुल्ला या दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला असून मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जात आहे. असे असतानाचा आता आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा…डोंबिवलीत पदपथावरील फटाके स्टाॅल काढण्यास सांगितल्याच्या रागातून रहिवाशाला बेदम मारहाण; डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील प्रकार

हाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे उद्योग ठाणे पोलिसांकरवी सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपल्या कार्यकर्तव्यानुसारच काम करावे. दबावाखाली येऊन कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे. पकडून आणून कोणालाही बसविणे, हे आपले काम नाही ” असा आशयाचा मजकूर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा – कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर आरोप केला आहे. तर २३ नोव्हेंबरच्या निकालानंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा जरा ” असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला आहे.

हेही वाचा…कथोरेंसाठी कदाचित मी महत्त्वाचा नसेन, म्हणून मला आमंत्रण नव्हतं; आमदार किसन कथोरेंबाबत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य

तुम्ही पोलिसांचा किती गैरवापर केला – आनंद परांजपे

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेची भाषा करणारे तुम्ही सत्तेत असताना पोलिसांचा किती गैरवापर केलात ते विसरलात का? उदा. अनंत करमुसे ला स्वतःच्या बंगल्यात नेऊन केलेली मारहाण, ठाणे महानगरपालिका अधिकारी महेश आहेर यांना तुमच्या सहकाऱ्यांनी केलेली मारहाण, भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांना खोट्या पीटा व पोस्कोमध्ये अडकविण्याचे षडयंत्र. असा मजकूर ट्विट करत आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समाजमाध्यमांवर चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे.