आरे जंगलातील मेट्रो कारशेडला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाने ठाण्यात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे आंदोलनस्थळी केवळ २० ते २५ कार्यकर्तेच उपस्थित होते. काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारले जात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन पुकारले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन कॅडबरी जंक्शन येथे झाले. परंतु या आंदोलनात ठाण्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे आंदोलनात जेमतेम २० ते २५ कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते. या संदर्भात ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी आठवड्यापासून प्रकृती ठीक नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधने शक्य झाले नसल्याचे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Back of congress office bearers in thane in save aare movement amy