मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील रस्तेकामे किती निकृष्ट झाली आहेत, याची प्रतिची आली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि त्यात पाणी साचले. त्याचा फटका रहिवाशांना आणि वाहन चालकांना बसला. शहरात कुठेही नाले तुंबल्याने व पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढावलेली नव्हती.
बदलापूर पूर्वेला अतिथी हॉटेल ते अभ्युदय बँक, रेल्वे स्थानकालगत असलेला रस्ता व महेश ज्वेलर्ससमोरील रस्ता, नगर परिषदेसमोरील रस्ता तसेच कात्रप भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डय़ांमधून पाणी साचले होते. दरम्यान, समर्थ चौक, पूर्वेला रेल्वे स्थानक तिकीट घरासमोर, रमेशवाडी आदी भागात झाडे कोसळल्याचे प्रकार घडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा