कल्याण – कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग अंतर्गत खडेगोळवली भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वीची डांबरीकरणाची कामे पालिकेने पूर्ण न केल्याने त्याचा फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. खडेगोळवलीतील राय रेसिडेन्सी परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चिखलमय रस्त्यावरुन येजा करण्यासाठी रिक्षाचालक तयार होत नसल्याने प्रवाशांना काही अंतर चालून मग रिक्षा पकडावी लागते. खडेगोळवलीतील राय रेसिडेन्सी परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. नोकरदार वर्ग या भागात अधिक आहे. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता असूनही पालिकेने या महत्वपूर्ण रस्त्याची देखभाल न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – बेकायदा जलवाहिन्यांमुळे गटाराचा प्रवाह बंद, दोन दिवसांपासून डोंबिवलीतील गोपीनाथ चौक जलमय

या रस्त्यावरुन शाळकरी मुले येजा करतात. शाळेच्या बस या रस्त्यावरुन जातात. पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना चिखलातून जावे लागते. पालक वर्ग त्यामुळे नाराज आहे. रात्रीच्या वेळेत या रस्त्यावर येजा करताना पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. कोट्यवधीचा कर वसूल करुन पालिका सुविधा देण्यात टाळाटाळ का करते, असे प्रश्न नागरिक करतात. चिंचपाडा प्रवेशव्दार, आडिवली ढोकळी भागातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काही दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.