Badlapur Crime : बदलापूर या ठिकाणी असलेल्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण ( Badlapur Crime ) केल्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातल्या आरोपीला फाशी झाली पाहिजे ही मागणी करत मुलींच्या पालकांसह बदलापूरकरांनी आंदोलन केलं. बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरही मोठा जनक्षोभ पाहण्यास मिळाला. या घटनेला चोवीस तास उलटताच आता अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आई वडिलांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी घटना काय घडली?

बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur Crime ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. दरम्यान अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी वेगळाच दावा केला आहे.

आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा दावा काय?

बदलापूर (Badlapur Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन (Mobile Phone) संपर्क साधण्यात आला. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी असा दावा केला आहे की अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नाही. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे पण वाचा- बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले, “त्या मुलींना…”

अक्षयचे आई वडील काय म्हणाले?

अक्षयचे आई-वडील म्हणाले, “अक्षयला फक्त १५ दिवस झाले होते कामाला लागून. १७ तारखेला त्याला पोलिसांनी धरलं. अक्षयला धरुन नेलं इतकंच आम्हाला सांगण्यात आलं. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली. माझ्या लहान मुलालाही पोलिसांनी मारलं. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेलं नव्हतं. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचो. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही.” असं अक्षयच्या आईने सांगितलं.

त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

आम्हाला मारहाण करण्यात आली

“आमच्या घरात लोक शिरले, आम्हाला मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर ढकलून दिलं. तुम्ही इथे राहूच नका असं आम्हाला सांगितलं. आमचं कुणी काही ऐकूनच घेतलं नाही.” असं अक्षयचे वडील म्हणाले. एबीपी माझाला फोनवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय शिंदेच्या आई वडिलांना हा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur crime akshay shinde is not guilty said his mother and father scj