Badlapur School Case Uddhav Thackeray Reaction : बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर (एका मुलीचं वय चार वर्षे, तर दुसऱ्या मुलीचं वय सहा वर्षे) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. नागरिकांनी बदलापूर बंदची हाक देत रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. तसेच ज्या शाळेत ही घटना घडली आहे त्या शाळेत तोडफोड केली. दरम्यान, हे आंदोलन चिघळलं असून पोलीस व आंदोलक आमनेसामने आले आहेत. बदलापूर स्थानकात दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं आहे. तर शाळेची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

दरम्यान, अत्याचाराचं प्रकरण व बदलापूरमधील आंदोलनावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे म्हणाले, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. तत्पूर्वी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. प्रशासनाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात दिरंगाई करू नये.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबव्या, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचं सरकार (महाविकास आघाडी) ‘शक्ती’ कायदा आणणार होतं. त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र तेव्हा करोनाचा काळ होता. त्यामुळे आपल्याला केवळ दोन ते तीन दिवस अधिवेशन घेता येत होतं. अधिवेशनात आपल्याला शक्ती विधेयक मांडता आलं नाही. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही शक्ती कायदा पारित करणार होतो. मात्र काही लोकांनी गद्दारी करून आमचं सरकार पाडलं. आता या गद्दारांनी सरकार स्थापन केलं आहे. मात्र, शक्ती विधेयक प्रलंबित ठेवलं आहे.

हे ही वाचा >> Badlapur School Case: बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन चिघळले; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

ती शाळा भाजपाशी संबंधित लोकांची : ठाकरे

माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “सरकारने अशा गुन्हेगारांना आणि अशी घाणेरडी विचारधारा असणाऱ्या लोकांना शक्ती कायद्याची शक्ती दाखवून दिली पाहिजे. मला असं समजलं आहे की ती शाळा भाजपाशी संबंधित लोकांची आहे. मी राजकारण करत नाहीये. इतरांनीही राजकारण करू नये. मात्र, आरोपीवर तातडीने कारवाई केली पाहिजे”. दरम्यान, आरोपी भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे दावे काही पालकांनी केले आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तो आरोपी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो भाजपाचा कार्यकर्ता असला तरी कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता त्याच्यावर कावाई झाली पाहिजे”.

Story img Loader