बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकातील गर्दीचे विभाजन करणारा बहुप्रतिक्षित होम फलाट ऑक्टोबर अखेरीस प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी या फलाटाचे काम पूर्णत्वास गेलेले नाहीये. त्यामुळे प्रवाशांना सुरू असलेल्या कामांमधून वाट काढतच या फलाटाचा वापर करावा लागतो आहे. होम फलाटासह त्यावर असलेल्या स्कायवॉकला वेगळे रूप दिले जात आहे. त्याचे काम जून २०२४ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र होम फलाटाच्या कामातील दिरंगाईमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

झपाट्याने नागरीकरण झालेल्या बदलापूर शहरात रेल्वे प्रवाशांची संख्याही वेगाने वाढली. सर्वाधिक वर्दळीच्या अशा फलाट क्रमांक एक आणि दोनवरील गर्दी विभाजनासाठी येथे पश्चिम दिशेला होम फलाट असावा अशी प्रवाशांची मागणी होती. त्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये या फलाटाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. मात्र भूमिपूजन होऊन काही महिने उलटूनही जागेचा प्रत्यक्ष ताबा न मिळाल्याने होम फलाटाच्या उभारणीचे काम उशिराने सुरू झाले. येथील स्कायवॉकखाली असलेले रिक्षा थांबे, दुकाने या जागा मिळवण्यात रेल्वे प्रशासनाला मोठे श्रम आणि वेळ खर्च करावा लागला होत. गेल्या काही महिन्यांपासून होम फलाटाच्या कामाला वेग आला आहे. उपलब्ध जागेत फलट्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण जागा उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण फलाटाचे काम सुरू झाले. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने या फलाटाचे काम ऑक्टोबर २०२३ अखेर पूर्ण होईल अशी माहिती संबंधित रेल्वे, कोळशा आणि खाण राज्यमंत्री यांच्या कार्यालयाला दिली होती. त्यामुळे फलाटाचे काम वेगाने मार्गी लागेल अशी आशा होती. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी फलाटाचे काम पूर्ण झालेले नाही. अजुनही फलाटावर लाद्या बसवणे, संरक्षक भिंती उभारणे, छप्पर बसवणे, पायऱ्या तयार करणे अशी कामे सुरू आहेत. त्यामुळे या फलाटाचे काम मार्गी लागण्यासाठी २०२४ वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. परिणामी अपूर्ण होम फलाटावरूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
cm devendra fadnavis gharkul scheme
Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?

हेही वाचा… शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडले

हेही वाचा… ठाण्यात अजित पवार गटाने शरद पवारांचे फलकावरील छायाचित्र काढले

प्रवाशांची कसरत

बदलापूर पश्चिमेकडील या होम फलाटावर मोठ्या प्रमाणावर धुळ असून त्यातूनच प्रवासी प्रवास करत आहेत. फलाटाच्या कल्याण दिशेला जुन्या फलाटाचे आणि शेजारच्या स्कायवॉकचे लोखंडी छप्पराचे साहित्य पडले आहे. रात्रीच्या वेळी येथे अंधार असल्याने प्रवासी चाचपडत प्रवास करत आहेत. त्यामुळे फलाटाचे काम वेगाने मार्गी लावण्याची आशा होते आहे.

Story img Loader