बदलापूर: वामन म्हात्रे हे बदलापूरचे नाही तर बेलापुरचे महापौर होतील, असे गणेश नाईक म्हणाले असतील असा मार्मिक टोला आमदार किसन कथोरे यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी बदलापुरात आलेल्या वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे वामन म्हात्रे महापौर होतील, असे भाकीत केले होते. भाजप नेत्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपात अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर आमदार कथोरे यांनी नाईक यांच्या या वक्तव्यावर मिश्किल टिपणी करत महापौर पदाच्या दाव्याची हवाच काढून टाकली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीनंतर बदलापूर शहरात आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यामधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. वामन म्हात्रे आणि किसन कथोरे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या आठवड्यात भाजपचे शिक्षक आमदार आणि वामन म्हात्रे यांचे बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी बदलापूर अंबरनाथ एकत्रित महापालिका होईल आणि वामन म्हात्रे त्याचे महापौर होतील, असे भाकीत केले होते. बदलापूर शहरात गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजप संघर्षात भाजप नेत्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याने भाजपात अस्वस्थता पसरली होती. शहरात शिवसेनेचे नगरपालिकेवरील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपात मोठी तयारी सुरू आहे. आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी कंबर कसली आहे. अशात नाईक यांच्या वक्तव्यामुळे भाजपात नाराजी पसरली होती. यावर आमदार किसन कथोरे काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या किसान कथोरे यांच्या माध्यमातून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या कार्यक्रमात बोलताना आमदार किसन कथोरे यांनी गणेश नाईक यांच्या भाकिताची हवा काढली. गणेश नाईक हे बदलापूरच्या नाहीतर बेलापूरच्या महापौराबद्दल बोलत असावे. म्हात्रे बेलापूरचे महापौर होतील असा मुश्किल टोला त्यांनी बोलताना लगावला. कथोरे यांच्या वक्तव्यामुळे नाईक यांच्या वक्तव्याची हवा काढण्याची चर्चा शहरात रंगली होती. त्याचवेळी त्यांनी विधानसभेतील विरोधकांवर टीकाही केली.

हेही वाचा : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष

विरोधकांचा हवशे गवशे म्हणून उल्लेख

माझ्या विधानसभा निवडणुकी वेळी अनेक हवशे गवशे नवशे एकत्र आले होते, असे सांगत त्यांनी विधानसभेत विरोधात काम करणाऱ्या कपिल पाटील वामन म्हात्रे यांच्यावर शेलक्या शब्दांत टोलेबाजी केली. मात्र माझ्या मतांमध्ये ते फरक पाडू शकले नाहीत. गेल्या विधानसभेत मला एक लाख ७४ हजार मते मिळाली होती. यंदा एक लाख ७६ हजार मते मिळाली. माझे मताधिक्य त्यांनी कमी केले. मात्र तरीही त्यांची झोप उडाली आहे. पण याची भरपाई मी येत्या निवडणुकीत नक्कीच करणार आहे. त्यावेळी त्यांना कळणार नाही की मत चाललंय कुठे, असा इशारा यावेळी बोलताना आमदार कथोरे यांनी दिला.