Badlapur Protest Against Sexual assault Case : बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला २४ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत बदलापूरकर मंगळवारी (२० ऑगस्ट) रस्त्यावर उतरले होते. बदलापूरकरांनी तब्बल १० तास लोकल सेवा व मेल – एक्सप्रेसची वाहतूक रोखून धरली होती. हे आंदोलन रोखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. लाठीहल्ला करून पोलिसांनी जमाव पांगवला व त्यानंतर मुंबई लोकल सेवा चालू झाली. दरम्यान, आता या आंदोलकांविरोधात (Badlapur Protest) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ४० आंदोलकांना अटक केली आहे. तसेच ३०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आंदोलकांना आज (बुधवार, २१ ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
massajog sarpanch killed marathi news
मस्साजोगच्या सरपंचाचा अपहरणानंतर मृतदेह आढळल्याने केजमध्ये तणाव; ग्रामस्थ आक्रमक, रुग्णालय परिसरात जमाव

दरम्यान, महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीने (MSCPCR) शाळा प्रशासनावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शाळेने आरोपीला कामावर रुजू करुन घेण्याआधी त्याची माहिती का घेतली नव्हती? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >> Badlapur sexual assault : “बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता, कारण..”; संजय राऊत यांचा आरोप

महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीने काय म्हटलं आहे?

महाराष्ट्र राज्य बालहक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितलं की, “बदलापूरच्या शाळेत घडलेली चिमुकल्या मुलींच्या लैंगिक शोषणाची ही घटना अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. शाळेतील यंत्रणेचं हे अपयश आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. शाळेने ही घटना उघड होऊ दिली नाही. त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी FIR नोंदवण्यासाठी १२ तास लावले. त्यामुळे मुलींची वैद्यकीय चाचणी १० तास लांबली. तसेच रुग्णालयात या मुलींना स्तनदा मातांच्या कक्षात ठेवण्यात आलं होतं. त्यांना दाखल करुन घेण्यासही नकार देण्यात आला होता”.

हे ही वाचा > Badlapur sexual assault : “बदलापूरमधल्या शाळेने आरोपी कर्मचाऱ्याची माहिती तपासली नाही, सीसीटीव्हीही नाहीत, मग..” MSCPCR चे ताशेरे

महिलांचा संताप

बदलापूरमधील आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. राज्यात सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार सरकारकडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र ‘लाडकी बहीण योजना, नको तर सुरक्षित बहीण योजना द्या’ अशी मागणी करणारे फलक बदलापूरकरांनी या आंदोलनावेळी झळकावले होते.

Story img Loader