बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारांनंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय. या आंदोलनात आतापर्यंत अटक झालेल्या २५ जणांपैकी दोन जण रायगड जिल्ह्यातले असून १ जण वांगणीच्या कासगाव येथील आहे. त्यांच्या राहत्या पत्त्यांची नोंद त्यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये झाल्याने ही बाब उघड झाली. यामुळे बदलापूर शहरातल्या आंदोलनात बदलापूरकर नसल्याची राजकीय नेत्यांची ओरड उघडी पडली आहे.

बदलापूर शहरात २० ऑगस्टला झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. मात्र, हे आंदोलक बदलापुरातील नसून बाहेरचे असल्याची भूमिका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. तसेच, भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी देखील हाच पवित्रा घेतला होता. यामुळे बदलापुरात भडकलेले आंदोलन हे बदलापूरकरांचे की बाहेरच्यांचे? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या आंदोलनात अटक झालेल्या २५ जणांवरून खुलासा झालाय की हे आंदोलक शहरातील होते. त्यांच्यावर नोंद झालेल्या एफआयआरमध्ये त्यांचे पत्ते नमूद करण्यात आले आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील उकरूळ येथील एक, भिवपुरी येथील दुसरा तर बदलापूर शहराच्या हद्दीपासून जवळच्या कासगांव येथील एक असे ३ अटक आंदोलक शहराबाहेरील आहेत. तर उर्वरित २२ आंदोलक हे बदलापूरचे रहिवासी आहेत. तसेच,यातील प्रमुख २५ आरोपी आणि त्यांची नावे पाहता ते देखील बदलापूर शहरातील असल्याचं उघड झालंय.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

हेही वाचा >>>तुम्हाला आता समजले असेल महाराष्ट्र पोलिसांनी विश्वासार्हता का गमावली, जितेंद्र आव्हाडांची टीका

समाजमाध्यमांवर एफआयआर

आंदोलकांवर नोंद झालेल्या एफआयआरची पीडीएफ प्रत सध्या संपूर्ण शहरात व्हॉट्सअपमार्फत व्हायरल झाली आहे. याचा आधार घेत शहरातील नागरिक; ‘आंदोलक बदलापूरचेच होते’, ‘आम्ही बदलापूरचे नाहीत हे नाकारणारे तुम्ही कोण?’ अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर पसरवताना दिसत आहेत. हे संदेश पसरवाताना या एफआयआरमध्ये अटक आरोपींच्या नोंद पत्त्यांचा दाखला दिला जात आहे.

आंदोलकांचे वकीलही ‘बदलापूरकर’

या आंदोलकांचं वकील पत्र उल्हासनगर तालुका वकील संघटनेच्यावतीने घेण्यात आले आहे. या संघटनेचे सदस्य असलेले अँडव्होकेट प्रियेश जाधव हे बदलापूरचेच असून ते स्वतः कोर्टात आंदोलकांची बाजू मांडत आहेत. जाधव यांनी सांगितल्यानुसार, हे आंदोलन उत्स्फूर्त होतं. सगळे आंदोलक हे बदलापूर शहराचेच नागरिक आहेत. त्यांना बाहेरचे म्हणणं हे कधीच योग्य ठरणार नाही.

Story img Loader