महाशिवरात्रीपासून बदलापूर-स्वारगेट या बससेवेला प्रारंभ झाला. अनेक वर्षांपासून पुण्यासाठी बसची मागणी होत होती.
बदलापूरहून पुण्याला जाण्यासाठी आधी कर्जतला किंवा कल्याण गाठावे लागत होते. बदलापूरकरांचा हा द्राविडी प्राणायाम आता संपणार आहे. आमदार किसन कथोरे यांनी बससेवेसाठीची मागणी लावून धरली होती. सकाळी सात वाजता ही बस पुण्यासाठी निघेल आणि दुपारी पुन्हा बदलापूरला परत येईल. भविष्यात जळगाव तसेच कोकणातही थेट बससेवा सुरू होईल. या वेळी ठाणे जिल्हा भाजप प्रवक्ते राजन घोरपडे, शहराध्यक्ष मिलिंद नार्वेकर, संभाजी शिंदे उपस्थित होते.