बदलापूर: Maharashtra Weather Forecast गेल्या २४ तासात बदलापूर शहरात तब्बल २७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात झालेली ही सर्वाधिक नोंद आहे. त्या खालोखाल भिवंडीत २५७, मुंब्रा शहरात २३१ मिलिमीटर तर ठाणे शहरात २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत असाच पाऊस पडल्यास जून महिन्याची सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये पाण्याची भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस सर्वत्र कोसळतो आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही मिनिटांसाठी विश्रांती घेणारा पाऊस नंतर जोरदार कोसळतो. जून महिन्यात उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे जल चिंता निर्माण झाली होती. गेल्या २४ तासात ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वाधिक २७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बदलापूर खालोखाल भिवंडीत २५७, मुंब्रा शहरात २३१ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. तर ठाणे शहरात २०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे विविध ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. हा पाऊस शुक्रवारपर्यंत असाच पडल्यास जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडण्याची शक्यता खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शहरांचा पाऊस
(२९ जून २०२३ सकाळी ८:३० पर्यंतचा गेल्या २४ तासातील पाउस (मिमी मध्ये)
बदलापूर २७३
भिवंडी २५७
मुंब्रा २३६
ठाणे २०६
डोंबिवली १७९
दिवा १७४
अंबरनाथ १५७
उल्हासनगर १५०
कल्याण १३५