Badlapur School Crime Case : बदलापूरमध्ये एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर १३ ऑगस्ट रोजी लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला. यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आज (२० ऑगस्ट) सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनामुळे जवळपास १० तासापांसून अधिक वेळ रेल्वेसेवा ठप्प होती. सातत्याने विनवण्याकरून आणि मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आवाहनानंतरही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च करत दहा मिनिटात रेल्वे मार्ग मोकळा केला.

पोलिसांच्या लाठीचार्च केल्यानंतर आंदोलक रुळावरून हटले. जवळपास दहा तासांपासून रेल्वे मार्ग ठप्प होता. रेल्वेसेवा ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवाशी खोळबले होते. एवढंच नाही तर बदलापूरमधून जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलची सेवाही ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी लाठीचार्च करत रेल्वे मार्ग मोकळा केला. त्यानंतर अखेर संध्याकाळी बदलापूर रेल्वे स्थानकावरून पुन्हा एकदा रेल्वे सेवा सुरळीत झाली. यानंतर बदलापूरवरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.

Movement to resume Kisan Special Train services
किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai local-train
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर
Mumbai Local News Mega Block
Mumbai Local News: मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली, ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा पायी प्रवास
Mumbai Western Railway Jumbo Block
जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर प्रचंड गर्दी

हेही वाचा : “ठराविक लोकांना इथं सोडलं”, बदलापूरच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा विरोधकांवर गंभीर आरोप

नेमकं घटना काय?

बदलापुरातील एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी सहा वाजल्यापासून शाळेच्या समोर पालकांकडून आंदोलन सुरू होतं. त्यानंतर साडेनऊ वाजल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. यानंतर आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला. त्यामुळे बदलापूर कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला.

यानंतर पोलिसांनी सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानीक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलक हटत नव्हते. यामुळे जवळपास नऊ ते दहा तास रेल्वे मार्ग ठप्प होता. अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे मार्ग मोकळा केला. आंदोलनामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा अखेर १० तासानंतर सुरळीत झाली. तसेच बदलापूरवरून सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक सुरू झाली आहे.

बदलापूर प्रकरणी एसआयटी स्थापन

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण हे धक्कादायक आहे आणि या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करुन सदर प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत.

Story img Loader