बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीने वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातला सहभाग मान्य केला. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विशेष तपास पथकाने (SIT) बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.

विशेष तपास समितीने दाखल केलं आरोपपत्र

विशेष तपास समितीने कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह २० पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षी या प्रकरणी नोंदवण्यात आल्या आहेत. आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचंही तिने सांगितलं होतं. याप्रकरणी सोमवारी प्रथम आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे विशेष तपास पथकाच्या प्रमुख महानिरीक्षक आरती सिंह यांनी सांगितले.

Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Abhishek Ghosalkar murder case, CBI,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे बोट
mbay high court warns sit over Badlapur sexual assault case
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : जनक्षोभाला बळी पडून घाईने आरोपपत्र दाखल करू नका, उच्च न्यायालयाने एसआयटीला बजावले
Badlapur Sexual Assault News
Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत एसआयटीने दिली ‘ही’ माहिती
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
High Court said demanding money by Gesture is not corruption
उच्च न्यायालय म्हणाले, इशाऱ्याने पैशाची मागणी करणे भ्रष्टाचार नव्हे…
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?

हे पण वाचा- बदलापूर, पश्चिम बंगालसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी एवढे करावेच लागेल!

५०० पानांचं आरोपपत्र

बदलापूर प्रकरणात विशेष तपास पथकाने भारतीय न्याय संहिता कलम ६५ (२) (१२ वर्षांखालील महिलेवर बलात्कार), ७४ (महिलेवर अत्याचार करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), ७५ (लैंगिलैं क छळ करणे), ७६ (महिलांविरोधात जबरदस्ती), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४ (२), ८ व १० अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. प्रत्येकी ५०० पानांच्या या आरोपपत्रात प्रत्येकी २० पेक्षा जास्त साक्षीदार, वैज्ञानिक पुरावे यांचा समावेश आहे. कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

बदलापूर प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा

आरोपीने बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचं पोलीस चौकशीत आणि डॉक्टरांसमोर मान्य केलं आहे. ही माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील १८३ तरतुदीनुसार दोन्ही बालिकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनीही ओळखले आहे.

बदलापूरचं प्रकरण काय?

बदलापूर येथील एका प्रतिथयश शाळेत दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. १३ ऑगस्टला ही घटना घडली. यानंतर शाळेने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडितेच्या पालकांनी केला. या प्रकरणाची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा २० ऑगस्टला बदलापूर बंद ठेवण्यात आलं होतं. रेल रोको करण्यात आला, तसंच बदलापूरमध्येही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अक्षय शिंदे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. त्याला अटक करण्यात आली. यानंतर हे प्रकरण विशेष तपास समितीकडे देण्यात आलं होतं. आता या प्रकरणात आरोपीने गुन्हा मान्य केला आहे.