ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजविण्यात आला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केले. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला.

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता. त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते.

Crime against city president of Shinde group fraud of Rs 1 crore 56 lakh by lure of job
शिंदे गटाच्या शहराध्यक्षाविरुद्ध गुन्हा, नोकरीचे आमिष दाखवून…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच

हे ही वाचा…भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रंदवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार , मागील दोन दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता. अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृददेह दफन करण्याचे निश्चित झाले. तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खणण्यात आला होता. स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले. त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा बुजविला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढले.

हे ही वाचा…कल्याणमधील पत्रीपुल येथे बॉयलरवाहू वाहनाचा पुलर उलटल्याने वाहन कोंडी

रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला. शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. तसेच जेसीबीच्या बुजविण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला. परंतु शववाहिनी दाखल होताच, तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडविण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला.

Story img Loader