Badlapur Sexual Assault Ajit Pawar Shakti Criminal Laws : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कायक घटना (Badlapur Sexual Assault) १२ ऑगस्ट रोजी घडली. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच याप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या शाळेविरोधात, गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. दरम्यान, आता या प्रकरणावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बदलापूरमधील आंदोलन राजकीय प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मी यावेळी ठरवलं आहे की मला योग्य वाटेल तेच बोलेन. इतर लोक, विरोधक काय बोलत आहेत त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. ज्याला बोलायचं आहे ते बोलतील, मी मात्र मला योग्य वाटेल तेच बोलेन. या घटनेबाबत माझी एकच भावना आहे की असल्या नराधमांना अतिशय कडक शासन केलं पाहिजे. जेणेकरून पुन्हा कोणी असं काहीतरी करण्याचं धाडस करणार नाही. गुन्हेगारांना असं शासन करावं की पुन्हा असं काही करण्याचा विचारही केला नाही पाहिजे.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
MLA Rohit Pawar alleged that MLAs gave contracts in Municipal Corporation to their relatives
पिंपरी : चिंचवडमध्ये आमदारांच्या नातेवाइकांचा कंत्राटदार ‘पॅटर्न’; कोणी केला हा आरोप
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

आपण शक्ती कायद्यासाठी प्रयत्न केले होते : अजित पवार

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी अजित पवारांना विचारलं की बदलापूरसारख्या (Badlapur Sexual Assault) घटना रोखण्यासाठी, गुन्हेगारांना त्वरित शिक्षा देण्यासाठी विधानसभेत यासाठी कायदा करायला हवा असं तुम्हाला वाटतं का? त्यावर अजित पवार म्हणाले, असा कायदा केंद्र सरकारने करायचा असतो. आम्ही शेवटी केंद्रालाच शिफारस करत असतो. मागे आपण (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) शक्ती कायदा करण्याचा विचार करत होतो. मागच्या सरकारने तसा प्रयत्न केला होता. आपल्या शेजारच्या राज्यात असा कायदा करण्यात आला आहे. आम्ही त्यांच्या कायद्याचा अभ्यास करून व आपल्या राज्यातील मागणीसंदर्भात विचार करून एक अहवाल तयार करण्यासाठी समिती गठित केली होती. पण त्यावेळी आपल्याला तो कायदा करता आला नाही.

Badlapur School Case Updates in Marathi
बदलापूर प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांचा विलंब (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

हे ही वाचा >> Supriya Sule on Badlapur School Case: “…तर सरकारनं मला फाशीची शिक्षा द्यावी”, सुप्रिया सुळेंची आगपाखड; म्हणाल्या, “सरकारनं माझी सुरक्षा काढून घ्यावी”!

अजित पवार म्हणाले, “बलात्काराच्या (Badlapur Sexual Assault) घटना पाहून काही लोक म्हणतात की मुलींनी रात्री उशीर झाल्यावर घराबाहेर पडू नये. परंतु, मला ते काही पटत नाही. म्हणजे मुलांनी घराबाहेर पडायचं आणि मुलींनी बाहेर जायचं नाही, हे चुकीचं आहे. मुलींबद्दलचा हा दृष्टीकोन चुकीचा आहे. आपण आपलं हे मत बदललं पाहिजे. कारण मुली देखील आपल्या समाजाचा मोठा घटक आहेत. त्याउलट आपण आपल्या माय-माऊली, बहीण व मुलींना संरक्षण दिलं पाहिजे”.