Badlapur Sexual Assault Accused Akshay Shinde shot dead: बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. प्रत्युत्तरात गोळीबार केला असता त्याचा मृत्यू झाला. ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला, त्या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते, अशी माहिती समोर येत आहे.

कोण आहेत अक्षय शिंदेवर गोळी झाडणारे अधिकारी?

ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांचा उल्लेख झालेला नाही. संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केलेले आहे. या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केले होते. दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता.

nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
DCM Eknath Shinde first Reaction
Eknath Shinde: “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
maharashtra government formation eknath shinde will be part of government led by devendra fadnavis
आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल
Stock of village hand bombs seized in Thane news
ठाण्यात गावठी हात बाॅम्बचा साठा जप्त
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

हे वाचा >> “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत १०० हून अधिक जणांना चकमकीत ठार केले होते. १९८३ साली मुंबई पोलीस दलात भरती झाल्यानंतर १९९० साली अंडरवर्ल्ड जगतातील गुंडांना चकमकीत ठार केल्यानंतर शर्मा चर्चेत आले होते. दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळीतील अनेक गुंडांना त्यांनी कंटस्नान घातले होते. २००६ साली छोटा राजनचा सहकारी लखन भैया याला बोगस चकमकीत ठार केल्याप्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

हे ही वाचा >> बदलापूर लैगिंक अत्याचार प्रकरण नेमके काय होते?

संजय शिंदे यांनीही मुंबई पोलीस दलात काम केलेले आहे. सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता. खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलीस कोठडीतून पळून गेल्या प्रकरणी संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांना चौकशीचा सामना करावा लागला होता. विजय पालांडे आणि संजय शिंदे एकमेकांना ओळखत असल्यामुळे शिंदे यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

२०१४ साली संजय शिंदे यांचा मुंबई पोलीस दलात पुन्हा समावेश करण्यात आला होता.

Story img Loader