बदलापूरः डिजीटल अटकेसह ऑनलाईन फसवणुकीच्या असंख्य प्रकारांबाबत शासन जनजागृती करत असले तरी नागरिकांची फसवणूक मात्र थांबलेली नाही. बदलापुरातील एका महिलेला २ लाख ३८ हजार रूपयांना अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून राहूल एस. के. नावाच्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात ऑनलाईन फसवणुकीत डिजीटल हा प्रकार समाविष्ट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांना मोबाईल फोन, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणुकीचे फोन येतात. अनेक जण घाबरून किंवा मोहात पडून यात फसतात. सध्या याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक दूरध्वनी क्रमांकावर एक संदेश प्रसारित केला जातो आहे. मात्र त्यानंतरही लुटीचे प्रकार सुरूच आहेत. अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्येही विविध नागरीकांची रोज अशा चोरांकडून फसवणुकीत होत असल्याचे समोर आले आहे. बदलापूर येथील शिरगाव भागात राहणाऱ्या एका महिलेला राहुल एस. के. नावाच्या अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअपवर संपर्क साधत क्रीप्टो चलनामध्ये गुंतवणुक करत अधिकचा परतावा देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर चोरांकडून महिला पत्रकाराला विविध बॅंक खात्यांचा क्रमांक पाठवत त्यामध्ये टप्या टप्याने २ लाख ३८ हजार ५५४ रूपये पाठवण्यास भाग पाडले.

मात्र गुंतवणुक करूनही परवाता येत नसल्याने आपली आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिला पत्रकाराने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या राहुल एस. के. याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेली महिला माध्यम क्षेत्रात कार्यरत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.