लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बदलापूर: पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण सोमवारी होते आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र होम प्लॅटफॉर्मवर सोमवारीही प्रवासी उन्हातच लोकल पकडण्यासाठी उभे असल्याचे चित्र होते. अपूर्ण कामावरून टीका करत महाविकास आघाडीने या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करण्याची भूमिका जाहीर केली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्याच्या कामाला २०१९ वर्षात सुरुवात झाली. खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून या होम प्लॅटफॉर्म कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. सोमवारी या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण केले जाणार आहे. सोमवारी भाजपचे विविध पदाधिकारी या होम प्लॅटफॉर्मवर लोकार्पण कार्यक्रमाची तयारी करत होते. मात्र अजूनही होम प्लॅटफॉर्मवर विविध कामे सुरू आहेत. यावरच बोट ठेवून महा विकास आघाडीतील पक्षांनी या लोकार्पण सोहळ्याला विरोध केला आहे.
आणखी वाचा-ठाण्यात एसटी बसगाडीमध्ये आग, प्रवासी सुखरूप
हा सोहळा निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्याची धडपड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार ) यांनी केला. तर आधी सुविधा द्या मग लोकार्पण करा असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. मात्र होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले आहे असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. होम प्लॅटफॉर्मचे मंजूर काम पूर्ण झालेले आहे. होम प्लॅटफॉर्मवर ज्या ठिकाणी छताचे काम सुरू आहे. ते काम नंतर मंजूर झाले होते. डेक आणि पादचारी पूल उभारण्याच्या ३५ कोटींना मंजुरी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. मात्र होम प्लॅटफॉर्मचे काम अपूर्ण असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा भाजपचे राजेंद्र घोरपडे यांनी केला आहे. हेही काम लवकरच पूर्ण होईल, असेही घोरपडे म्हणाले आहे.