निरनिराळ्या आकारांच्या रंगीबेरंगी छत्र्या बाजारात
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चित्रपटाचे कथानक हे काल्पनिक असले तरी त्यातील व्यक्तिरेखा, त्यांनी परिधान केलेले पेहेराव, त्यांची लकब याचे समाजात मोठय़ा प्रमाणात अनुकरण होत असते. गेल्याच महिन्यात प्रदर्शित होऊन उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केलेल्या ‘बाहुबली’ सिनेमाबाबतीतही असेच घडले असून दुर्जनांसाठी कर्दनकाळ ठरलेली बाहुबलीची तलवार चक्क छत्रीच्या अवतारात येत्या पावसाळ्यात दिसणार आहे. पावसाळ्यानिमित्त नेहमीप्रमाणे यंदाही बाजारात निरनिराळ्या आकारांच्या रंगीबेरंगी छत्र्या आल्या असून त्यात बाहुबलीच्या तलवारीच्या रूपातली छत्री हे खास आकर्षण आहे.
यंदा बाजारामध्ये विविध शस्त्रांवरून प्रेरणा घेत छत्र्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बंदूक, तलवार, पोलिसांची काठी, आदी शस्त्रांचा समावेश आहे. त्याबरोबर जोडप्यांसाठी कपल छत्री, प्रियजनांना भेट देण्यासाठी हार्ट आकाराची छत्री, तसेच महिलांच्या सोयीसाठी मिनी छत्री असे अनेक प्रकार यंदा बाजारात पाहायला मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी आजोबांची म्हणून अडगळीत पडलेली मोठी, पूर्ण आकाराची काळी छत्री आता नव्या पिढीला आवडू लागली आहे. लाकडी मूठ असलेली ही छत्री आवर्जून वापरली जाऊ लागली. पाऊस नेहमीचा असला तरी त्याला तोंड देण्यासाठी दर वर्षी छत्र्या मात्र विविध प्रकारच्या हव्या असतात. यंदा छत्र्यांच्या विश्वात नवे शोधू पाहणाऱ्यांना ‘बाहुबली’चे शस्त्र आवडू लागले आहे. पाचशे ते दीड हजार रुपये किमतीच्या या छत्र्या महाविद्यालयीन तरुणांसाठी तयार करण्यात आल्याचे ठाण्यातील विष्णूनगर येथील विक्रेते भूमीन छेडा यांनी सांगितले. गडद काळ्या रंगातील ही छत्री यंदाच्या पावसाळ्यात भाव खाऊन जाईल, असा अंदाज आहे.
सैनिकी छत्री
देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी जनसामान्यांमध्ये आदराची भावना असते. या खऱ्याखुऱ्या हिरोंची आठवण करून देणारी बंदुकीच्या आकारीची सैनिकी छत्रीही यंदा बाजारात लक्ष वेधून घेते.
निंजा छत्री
बच्चे कंपनीमध्ये लोकप्रिय असलेल्या निंजा हातोडी या कार्टून मालिकेतील व्यक्तिरेखेच्या हाती असलेल्या तलवारीच्या आकाराच्या छत्र्याही बाजारात आल्या आहेत.
हृदय छत्री
केवळ रंग आणि छपाईच नव्हे तर छत्रीने पारंपरिक आकारही बदलला आहे. प्रेमाचे प्रतीक असलेल्या हृदयाच्या आकाराच्या छत्र्याही यंदा आहेत.
जोडप्यांसाठी कपल छत्री..
वय विसरविणारा पाऊस जोडप्यांसाठी रोमॅन्टिक असतो. ‘एक छत्री और हम है दो’असा एकंदर मामला असतो. मात्र आता दोघांनाही न भिजविता प्रवास घडवून आणणारी भलीमोठी कपल छत्री बाजारात आली आहे.