लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे: कोपरी येथील आनंदनगर भागात शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद चव्हाण आणि गणेश दळवी यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आनंदनगर भागात प्रमोद चव्हाण आणि गणेश दळवी हे भाजप पक्षासाठी काम करतात. काही दिवसांपूर्वी प्रमोद चव्हाण यांनी समाजमाध्यमावर एक मजकूर लिहीला होता. हा मजकूर शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात असल्याचा आरोप म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर म्हस्के यांचे कार्यकर्ते चव्हाण यांच्या कार्यालयात गेले. कार्यालयात गेल्यानंतर चव्हाण आणि गणेश दळवी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केला होता. त्यानुसार त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्या आधारे चव्हाण यांच्याविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपामधील अंतर्गत वाद समोर आले होते. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी प्रमोद चव्हाण आणि गणेश दळवी यांनी वकील सतिश मिस्त्री यांच्या मार्फत ठाणे न्यायालयात जामीन अर्ज केला होता. या जामीनअर्जावर ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर झाल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.