उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात बाल शिवाजी उद्यान, कॅम्प तीनमध्ये बोट क्लब सुशोभीकरण, कॅम्प पाचमध्ये महिला भवन आणि मराठी संस्कृती भवनाची उभारणी केली जाणार आहे. १५ कोटी ५० लाखांच्या निधीतून या प्रकल्पांची उभारणी केली जाणार असून यात शासनाचा हिस्सा देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना गती मिळणार आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधांसह वैविध्यपूर्ण प्रकल्प उभारले जात आहेत. त्यातूनच शहरात भव्य क्रीडा संकूल, सांडपाणी योजना, पाणी योजना, इ चार्जींग स्टेशन, परिवहन सेवा यशस्वीपणे सुरू आहे. यातच आता तीन नवे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात बाल शिवाजी उद्यान, तर कॅम्प पाच भागात महिला आणि मराठी भवनाचा समावेश आहे. कॅम्प एक भागात या उद्यानाच्या उभारणीसाठी ५० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून या प्रकल्पासह इतर चार प्रकल्पांकरिता शासनाने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिली आहे. राज्य शासनच्या ७० टक्के तर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ३० टक्के भागीदारीत हे प्रकल्प केले जाणार आहेत.
हेही वाचा – ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
हेही वाचा – ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
u
उल्हासनगरातील एकूण चार प्रकल्पांसाठी १० कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. एकूण १५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चातून हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यात बाल शिवाजी उद्यानासाठी पालिकेचा हिस्सा १५ लाख असून शासनाने ३५ लाख देऊ केले आहेत. कॅम्प तीन भागात बोट क्लबचे सुशोभीकरण केले जाणार आहे. एकूण ५ कोटी रुपयांच्या प्रकल्पात शासन ३ कोटी ५ लाख रुपये देणार आहे. तर कॅम्प पाच भागात महिला भवनाची उभारणी केली जाणार आहे. त्यात शासन ३ कोटी ५ लाख रुपये देणार आहे. याच भागात मराठी बांधवांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे मराठी संस्कृती भवन उभारण्याची मागणी होती. या कामालाही आता गती मिळणार असून ५ कोटी रुपयांच्या खर्चातून या मराठी संस्कृती भवनाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने ३ कोटी ५ लाख रुपयांच्या हिस्सा देण्याला मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत होते. या प्रकल्पांमुळे शहराला वेगळी ओळख मिळणार आहे.