कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेत येत्या १ मे रोजी ‘हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे. या दवाखान्याचे उद्घाटन १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून होणार आहे, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम मुंबईतील विविध प्रभागांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची व्याप्ती ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात राज्याच्या आरोग्य विभागाकडून वाढविण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत कल्याण पश्चिमेतील तारांगण इमारत, तळमजला, वायलेनगर येथे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे, असे डाॅ. पानपाटील यांनी सांगितले.
या दवाखान्याच्या माध्यमातून बाह्य रुग्ण विभाग, असांसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण, माता बाल संगोपन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या दवाखान्यामुळे परिसरातील नागरिकांना आपल्याच भागात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ. सुधाकर जगताप यांनी सांगितले. या उपक्रमा व्यतिरिक्त येत्या दहा दिवसात पालिका हद्दीत कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये चार नवी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार आणि विविध प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत, असे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.