Porn Star Riya Barde Arrested from Ulhasnagar: भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र, त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राजकारणी व सत्ताधाऱ्यांना अपयश आलं आहे. त्यामुळे वेळोवेळी ठिकठिकाणी अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असतात. आता मुंबई उपनगरांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या पॉर्नस्टारचं आख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘भारतीय’त्वाची ओळख मिरवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रियाच्या आईनं केलं होतं अमरावतीतील व्यक्तीशी लग्न!

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख हिनं अमरावतीतील अरविंद बर्डे नावाच्या एका व्यक्तीशी याच कारणासाठी विवाह केला होता. रियाचा भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख असा हा आख्खा परिवारच बर्डे नाव धारण करून भारतीय झाला होता!

आई-वडील कतारमध्ये, रिया उल्हासनगरमध्ये

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात रियाची आई व वडिल हे दोघेही सध्या कतारमध्ये वास्तव्यास असल्याचं स्पष्ट झालं आहे. रिया इथे तिची बहीण आणि भावासोबत राहत होती. पोलिसांनी रियाला ताब्यात घेतलं असून तिची बहीण व भावाचा शोध चालू आहे. रियाला याआधीही वेश्याव्यवसाय प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली होती, असंही आता समोर आलं आहे.

अशी सापडली रिया!

गेल्या काही काळापासून ही पॉर्नस्टार व तिचं कुटुंब उल्हासनगरमध्ये सुखेनैव वास्तव्य करून होतं. पण रियाच्याच एका मित्रामुळे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं. प्रशांत मिश्रा नावाचा रियाचा मित्र या सगळ्यासाठी कारणीभूत ठरला. प्रशांत मिश्राला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बैकायदेशीररीत्या राहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली.

Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा

रिया बर्डे राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊसशी संबंधित?

दरम्यान, रिया बर्डे ही मधल्या काळात राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाऊससोबतही काम करत होती, असं पोलीस तपासात समोर आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. या काळात तिनं अनेक पॉर्न चित्रपटांमध्येही काम केल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangladeshi porn star riya barde arrested from ulhasnagar with fake documents pmw