बंजारा समाजाचे भवन उभारण्यासाठी नवी मुंबई येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सिडको अधिकाऱ्यांना देईल. पोहरादेवी विकासाचे बंद पडलेले काम तातडीने सुरू करण्यात येईल आणि सेवालाल महाराज जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुट्टी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केल्या.

हेही वाचा >>>‘मुंब्रा रेतीबंदर खाडी किनारी भरणी’; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Thane, Palghar, Eknath Shinde,
ठाणे, पालघरमध्ये शिंदे यांची भिस्त आयात उमेदवारांवर ?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Thane Municipal Employees, Diwali, Thane Municipal Employees Salary, Thane,
ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, सानुग्रह अनुदानापाठोपाठ वेतन दिवळीआधी जमा होणार
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
Mahayuti rebels Thane district, Thane district,
ठाणे जिल्ह्यात बंडोबांना थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हान
eknath shinde akola
शिवसेना शिंदे गटापुढे अस्तित्वाचा प्रश्न, अकोला व वाशीम जिल्ह्यात महायुतीमध्ये जागा मिळणार की नाही?
Shiv Sena, Eknath Shinde, assembly election 2024, thane district
ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
Citizens wait for a month for birth and death records in Thane due to technical problems in CRS portal
ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी महिनाभराची प्रतिक्षा; नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा नागरिकांना फटका

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी ठाण्यातील हायलँड मैदानात रविवार आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बंजारा भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. महाविकास सरकारमध्ये मंत्री होतो, त्या सरकार मध्ये मला जो अनुभव आला, तोच अनुभव मंत्री संजय राठोड यांना आला. चांगले दिवस असतील तर सर्वच असतात. पण, संकटकाळी सोबत राहतो, तोच खरा मित्र असतो. तसाच संकट काळात सहकाऱ्यांच्या सोबत उभा राहणे, हा माझा स्वभाव असून मंत्री संजय राठोड यांच्यावर आलेल्या संकटावेळी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

हेही वाचा >>>ठाणे : मी ट्रेलर म्हणून काम करतो तर, मुख्यमंत्री आल्यावर पिक्चर सुरू होतो ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत

दिलेला शब्द पाळतो म्हणूनच ४० आमदार माझ्यासोबत आले. शब्द दिला की मी माघर घेत नाही, हाही माझा स्वभाव आहे. मंत्री संजय राठोड यांना हे चांगले माहीत आहे, असेही ते म्हणाले. बंजारा समाजाने महाराष्ट्रच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहेनतीमुळे हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आता हा समाज कुठेही वंचित राहणार नाही. कारण आता जनतेचे सरकार आले आहे, असेही ते म्हणाले.