ठाणे : भिवंडी येथील एका व्यवसायिकाची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका सरकारी बँकेचा व्यवस्थापक आणि विमा अधिकाऱ्यांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा करीतआहे. तक्रारदाराचा भिवंडीत यंत्रमागाचा व्यवसाय आहे. २०१२ मध्ये त्यांनी सरकारी बँकेतून पाच कोटींचे कर्ज घेतले होते. त्यावेळी  बँक व्यवस्थापकाने व्यावसायिकास आपल्या पत्नीकडे गुंतवणूक करण्यास भाग पाडले.  व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने ९९ लाख ९९ हजार ७७८ रुपये  विमा योजनेत गुंतविले. परंतु व्यवस्थापकाने त्याची कागदपत्रे दिली नव्हती. काही वर्षांनी कागदपत्रांची मागणी तक्रारदाराने  केली असता, त्याच्या पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा