बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची तहाण भागवणाऱ्या बारवी धरण मंगळवारी दुपारच्या सुमारास ओसांडून वाहू लागले. त्यामुळे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी असून मंगळवारी धरणाने आपली ७२.६० मीटर पाणी पातळी गाठून धरण ओसांडून वाहू लागले. अवघ्या ३५ दिवसात बारवी धरण २५ टक्क्यांवर १०० टक्क्यांवर आल्याने पाणीकपातीचे संकट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी त्या तुलनेत जिल्ह्यात नव्या जलस्त्रोतांची निर्मिती झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ठाण्यात दिवसा अवजड वाहतूकीला बंदी; रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेतच वाहतूकीला मुभा,

ठाणे जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींसाठी १९७२ साली उभारण्यात आलेले बारवी धरण कालांतराने नागरी तहाण भागवण्यासाठी वापरात येऊ लागले. गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरे ज्यात ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच ग्रामीण भागातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे जिल्ह्याचे आणि पाणी पुरवठा व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणांचे डोळे लागलेले असतात. यंदाच्या वर्षात बारवी धरणाने तळ गाठला होता. २७ जून रोजी बारवी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा होता. उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्याची पाणीचिंता वाढली होती. पावसाने यंदा उशिर केल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला दर पंधरा दिवसांनी एक दिवस पाणी कपात करण्याची वेळ आली होती. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा होती.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील जवाहिऱ्यांला लुटणाऱ्या नणंद-भावजय अटकेत

२५ जूनपासून पावसाला सुरूवात झाली असली तरी धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडत नव्हता. त्यामुळे १ जुलेै रोजी धरणात अवघे ३१.७० टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने एकच महिन्याच्या काळात बारवी धरणात तब्बल ६९ टक्क्यांची भर पडली १ जुलै रोजी धरणात १०७.४० दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. तर मंगळवारी १ ऑगस्ट रोजी बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर बारवी धरणातून पाणी ओसांडून वाहू लागले. पावसाचा जोर कमी असल्याने बारवी धरण ९८ टक्क्यांवरून शंभर टक्क्यांवर जाण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागला. पावसाचा जोर कमी असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. सायंकाळी ७.४४ क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने जिल्ह्याची पाणीचिंता मिटली आहे.