लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : वागळे इस्टेट भागात एका ३३ वर्षीय तरुणाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मुलुंड येथील शास्त्रीनगर परिसरात तरूण वास्तव्यास आहे. रविवारी मध्यरात्री तो मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घोडबंदर भागात गेला होता. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास तो मुलुंड येथे घरी येण्यासाठी निघाला. त्यावेळी एका चालकाने रिक्षा त्याच्यासमोर येऊन थांबविली. त्या रिक्षामध्ये चालकासह एक व्यक्ती मागील आसनावर बसला होती. तरुण रिक्षामध्ये बसल्यानंतर तरूणाने मोबाईलमध्ये बाहेरचे चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. त्यावरून त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीसोबत त्याचे वाद झाले. यानंतर त्या व्यक्तीने तरुणाच्या गळ्याभोवती चाकू लावून त्याच्याकडून पाच हजार रुपये मागितले. तरूणाकडे पैसे नव्हते. त्यानंतर त्या व्यक्तीने तरूणाचा मोबाईल खेचत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली.

आणखी वाचा-ठाणे: रेल्वे स्थानकावरील स्टाॅल देण्याच्या बहाण्याने चारजणांची फसवणूक

तसेच पैसे देवाण-घेवाण करण्याऱ्या एका मोबाईल ॲपमधून २ हजार ५०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पैसे वळते झाले नाही. त्यामुळे तरूणाला मनोरूग्णालय परिसरात नेले. तिथे त्यांचे आणखी दोन साथीदार आले. चौघांनी मिळून तरूणाला पुन्हा मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचे डेबिट कार्ड घेऊन एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले. परंतु तिथे पैसे निघाले नाही. त्यामुळे रिक्षा चालकाने त्याला दुसऱ्या एका एटीएम केंद्रात नेले. तरूण तात्काळ तिथून पळ काढत एका इमारतीजवळ गेला. चौघे त्याचा पाठलाग करून तिथे आले. त्यांनी पुन्हा तरूणाला मारहाण करत त्याच्याकडील ४० हजार रुपयांचा मोबाईल आणि १ हजार २०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beat up the young man and robbed his money mrj
Show comments