कल्याण- इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका लष्करी जवानाने कल्याण मध्ये राहून मुंबई पोलीस दलात नोकरी करत असलेल्या एका ३० वर्षाच्या महिला पोलिसा बरोबर ओळखल वाढवली. या महिलेला लग्न करण्याचे वचन या लष्करी जवानाने दिले. त्यानंतर तिच्याशी संपर्क वाढवून तिच्यावर मागील दोन वर्षाच्या काळात बलात्कार केले. आता महिलेच्या खालच्या जातीचा प्रश्न उपस्थित करुन लष्करी जवानाने तिच्या बरोबर लग्न करण्यास नकार दिला. या महिला पोलिसाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लष्करी जवान आकाश जयधर घुले (२८) हा बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या पुणे खडकी येथील डी. आय. विभागात प्रशिक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी सांगितले, महिला पोलीस मुंबई पोलीस दलात नोकरी करते. दोन वर्षापूर्वी तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आकाश बरोबर झाली. नियमित बोलण्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. जवान आकाशच्या विचारण्यावरुन या महिलेने आपण भिल्ल आदिवासी समाजातील असल्याचे सांगितले होते. आकाशने आपण वंजारी समाजातील असल्याचे महिला पोलिसाला सांगितले होते.

हेही वाचा >>>डोंबिवलीत पाथर्ली नाक्यावरील विवाह मंडपाचा वाहतुकीला अडथळा, एक महिन्यापासून मंडप रस्त्यावर

आकाशने महिलेला आपण तुझ्या बरोबर लग्न करणार असल्याचे सांगितल्याने या महिलेने त्यावर विश्वास ठेवला. आकाश गेल्या वर्षीपासून महिला पोलिसाच्या कल्याण मधील घरी नियमित येऊन आठ दिवस राहू लागला. आकाश मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केळगावचा रहिवासी आहे.महिला पोलिसाच्या घरी राहण्यास असताना आकाशने एक दिवस रात्री एका शीतपेयात गुंगीचे औषध टाकून ते महिला पोलिसाला पिण्यास दिले. या महिलेची काही वेळ शुध्द हरपली. या संधीचा गैरफायदा घेत, महिला पोलिसाच्या इच्छेविरुध्द आकाशने तिच्यावर बलात्कार केला. वेळोवेळी आकाशने हे प्रकार केले.

हेही वाचा >>>भावली धरणाचे काम संथगतीने; पर्यावरण मंजुऱ्यांचा खोडा, ठाण्याचा ग्रामीण पट्टा तहानलेलाच

गेल्या वीस दिवसापूर्वी आकाश कल्याणला येऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. आकाशला नकार दिला तर तो या पीडितेला आपण तुझ्या बरोबर लग्न करणार नाही, अशी धमकी देत होता. अलीकडे आकाशचा चुलत भाऊ राजेश घुले याने महिला पोलिसाला संपर्क करुन आकाश आता दुसऱ्या मुलीबरोबर विवाह करणार आहे, असे सांगितले. आकाशने असे काही नसल्याचे पीडितेला सांगितले. महिला पोलिसाने धाडस करुन आकाशचे केज तालुक्यातील केळगाव गाठले. तिथे महिलेने आकाशला मला तुझ्या आई वडिलांना घडला प्रकार सांगायचा आहे असे सांगितले. आकाशने नकार देताच महिलेने स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यावेळी आकाशने आपण तुझ्या बरोबर लग्न करणार आहोत, असे पोलिसांसमोर सांगितले.

हेही वाचा >>>ठाण्यात काळ्या यादीतील ठेकेदाराला रस्त्यांची कामे, भाजपची चौकशीची मागणी

त्यानंतर तू आदिवासी समाजातील आहेस. आपले जमणार नाही अशी भूमिका आकाश घेऊ लागला. महिले आपण तुझ्या बरोबरच लग्न करणार, अशी आग्रही भूमिका घेतली. आकाशने महिलेला आपण आता विवाहबध्द होणार आहोत, असे आमिष दाखविले. पीडितेच्या आई, वडिलांसह नातेवाईकांना केळगाव येथील गावी विवाह जुळण्याच्या कार्यक्रमासाठी बोलविले. मागील शनिवारी महिला पोलिसाचे कुटुंब आकाशच्या केळगाव येथील घरी पोहचले. आकाशचे कुटुंबीय, गावातील पंच समिती उपस्थित होती. बैठकीतील चर्चेनंतर आकाशने महिलेला कुटुंबीयांचा आपल्या लग्नाला विरोध आहे. तू आदिवासी खालच्या जातीची आहेस अशी भूमिका घेतली.

लग्नाचे आमिष दाखवून आकाशने आपला गैरफायदा घेतला. आपली फसवणूक केल्याने महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.