जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर पाश्चिमात्य जगातील अनेक चालीरीती, सण आणि उत्सव आता भारतात साजरे होऊ लागले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारचा मैत्री दिन भारतीय मातीत रुजल्यानंतर आता युरोपात विशेष लोकप्रिय असलेला बीअर दिनही मोठय़ा उत्साहात साजरा होऊ लागला आहे. जगभरात ७ ऑगस्ट हा दिवस बीअर दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी आपापले कुटुंबीय, मित्र-मंडळींसोबत बीअर पार्टी केली जाते. यंदा ठाण्यातही विवियाना मॉलमधील ‘द बिअर कॅफे’ या दुकानात ऑगस्ट अखेपर्यंत आंतरराष्ट्रीय बीअर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
टकिला फ्लेवर असणारी अमिगोची इंग्लिश बीअर या निमित्ताने या महोत्सवात ठाणेकरांना चाखता येणार आहे. त्याचप्रमाणे ‘असाही’ (जपानी) ‘पॉलेनर’ (जर्मन) आणि ‘सॅगरेस’ ही पोर्तुगीज बीअर महोत्सवाची रंगत वाढवणार आहे. या चार विदेशी बीअर ग्राहकांना अवघ्या १८०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भारतीय नामांकित बीअरचा पर्यायही ‘द बीअर कॅफे’तर्फे ग्राहकांसाठी खुला करून देण्यात आला आहे. यामध्ये ‘बडवायझर’ आणि ‘हेनिकिन’ या बीअरचा समावेश आहे. बडवायझर बीअरच्या ४ पाइंट आणि एक स्टार्टर घेतल्यास ग्राहकांना ८९९ रुपये तर हेनिकिन बीअरचे ४ पाइंट घेतल्यास ग्राहकांना ११०० रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बीअर फेस्टिवलव्यतिरिक्त ‘द बिअर कॅफे’ येथे अतिशय दुर्मीळ आणि काही शतके जुन्या बीअरही उपलब्ध आहेत.
पन्नास प्रकारचे ब्रॅन्ड
’’द बिअर कॅफे’ मध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय ब्रॅंण्डच्या बीअरचा समावेश आहे. शिफर्ड निम या कंपनीची १६९८ मध्ये उत्पादित झालेली ‘१६९८’ ही ३१७ वर्ष जुनी बीअर तर ‘होइगार्डन’ ही १४४० मध्ये उत्पादित झालेली ५७५ वर्ष जुनी बीअर या ठिकाणी उपलब्ध आहे.
’चाईन स्टेफनर ही जर्मन कंपनी गेली कित्येक शतके बीअर व्यवसायाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अशा या बडय़ा नामांकित जर्मन कंपनीच्या विविध बीअर येथे उपलब्ध आहेत.
’रंगाला काळी दिसणारी आणि ‘कॉफी’ व ‘चॉकलेट’ या फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेली आर्यलडची गिनीस बीअरही येथे मिळते.
’‘एरडींगर’ (जर्मनी), ‘व्हीटलींगर’ (इंग्लंड) आणि ‘एरडिंगर डन्केल’ (जर्मनी) आदी परदेशी व्हीट बीअरही या ठिकाणी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे भारतात अन्य कुठेही व्हीट बीअर उपलब्ध नाहीत.
’ठाण्यात उत्पादित होणारे खास ‘व्हाईट झेन’ (व्हीट बीअर), रंगानी काळी असणारी ‘डोपेल गँगर’(डार्क व्हीट बीअर) आणि ‘इंडिया पेल अेल’ (आयपीए.) ही बीअरही या ठिकाणी आहे. चवीला वाईनसारखी लागणारी परंतु बीअर प्रकारात मोडणारी इंग्लंडची ‘लंडन पोर्टर’ ही बीअरही उपलब्ध आहे.
’चवीला व्हिस्कीसारखी लागणारी परंतु बीअर स्वरूपात उपलब्ध असणारी इंग्लंडची ‘सेंट्स व्हिस्की बीअर’ येथे मिळते.