ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याचे काम केले. ते आता भारत जोडण्याचे काम करण्यासाठी जोडो यात्रा काढत आहेत, अशी टीका भाजप नेते, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर येथे केली.महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले सरकार हे विकासाचे सरकार आहे. विकासाची कामे त्यांनी सुरू केली आहेत. आपला दौरा हा संघटनात्मक बांधणीसाठी आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कल्याण : आंबिवलीत रिक्षेच्या धडकेत दुचाकी वरील महिला गंभीर जखमी ; रिक्षा चालक फरार

केंद्रीय लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री ठाकूर रविवार पासून तीन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर दौऱ्यावर आले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बरोबर ते संवाद साधणार आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारा समोरील चौकात मंत्री ठाकूर यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, ग्रामीण अध्यक्ष नंदू परब यांनी स्वागत केले. कल्याण लोकसभा शिवसेनेचे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देऊन मंत्रा ठाकूर यांचे स्वागत केले.

काँग्रेसवर टीका करताना मंत्री ठाकूर म्हणाले, ज्यांनी अनेक वर्ष भारत तोडण्याचे केले. ब्रिटिश भारतामधून गेल्या नंतरही ब्रिटिश विचाराने चालून देशात कारभार केला. ती काँग्रेस आता भारत जोडण्यासाठी यात्रा काढत आहे. हे आश्चर्यकारक आहे. आम्ही तोडफोड करुन कधीही राज्य करत नाही. आधी काँग्रेसने तोडण्याचे काम केले. धर्माधर्मात भांडणे लावली. आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काँग्रेसला भारत जोडण्याची स्वप्ने पडू लागली, अशी टीका ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केली.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवली दौरा; चौकाचौकात भाजपाकडून बॅनरबाजी

ठाकूर यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले, जय श्रीरामचा जयघोष तुम्ही आता करत असले तरी त्यासाठी आपल्याला ४०० वर्ष लढाई लागली. रामल्लाचा जन्म झाला. त्या ठिकाणी भव्य राममंदिर असावे यासाठी तमाम भारतवासी विचार करत होते. यासाठी आपल्याला न्यायालयात लढाई लढावी लागली. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर अयोध्येचा विषय अधिक गतिमान झाला. येत्या वर्षभरात अयोध्येत राम मंदिर तयार होईल. आपले अनेक वर्षाचे स्वप्न साकार होईल, असे मंत्री ठाकूर यांनी सांगितले.