शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हटलं होते. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली, तर आम्हीही ऐकणार नाही. शेवटचा इशारा देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात, तर ‘मातोश्री’बाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले होते.

या वक्तव्याचा आमदार भास्कर जाधव यांनी समाचार घेत त्यांची तुलना वेस्ट इंडिजच्या खेळाडूबरोबर केली आहे. ठाण्यात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरनसारखे दिसतात का तर नाही. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू अ‍ॅब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, अ‍ॅब्रोस कसे दिसत होते.”

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Chandrakant Patil response regarding the candidature criticism received from Pune in the assembly elections Pune news
मी पुणेकर असल्यावर शिक्कामोर्तब; मोठ्या मताधिक्याचे कारण, चंद्रकांत पाटील यांचे टीकेला उत्तर

हेही वाचा : “एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल

“तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. उद्धव ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही,” असे भास्कर जाधव यांनी म्हटलं.

हेही वाचा : “अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!

“ज्या फडणवीसांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले…”

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याने मर्यादा ओलांडली आहे. पण, अजूनही आम्ही त्यांना शेवटची संधी देत आहोत. यापुढे आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल, तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचे घराबाहेर पडणे मुश्कील होईल. ज्या फडणवीसांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांच्याबाबत तुम्ही अशी विधाने कराल, असे कधीच वाटले नव्हते,” असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होते.

Story img Loader