भातसा धरणापासून १५ किमी अंतरावर आवरे गावाजवळ बुधवारी पहाटे उजवा कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाणी शिरल्याने ५० हुन अधिक शेतकऱ्यांचे किमान १०० एकर क्षेत्रातील भातशेती व भाजीपाल्याची नासाडी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. किमान ४० वर्षे जुना झालेल्या भातसा उजवा कालव्यातून पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा गुरुवारी, शुक्रवारी बंद

या कालव्याला कुठे न कुठे भगदाड पडून लाखो लिटर पाण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे. ७०० क्युसेक्स क्षमता असलेल्या उजव्या कालव्यातून अवघे २५० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. तरीही बुधवारी पहाटेच्या सुमारास भातसा कालव्याला आवरे गावाजवळ कालव्याल भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी आवरे गावातील ५० हुन अधिक शेतकऱ्यांच्या शेतात शिरून भातशेती व भेंडी लागवडीची किमान १०० एकर क्षेत्राची नासाडी झाली असल्याचा अंदाज तेथील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

हेही वाचा >>> वीज कंपन्यांच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना वेठीस धरू नका, लघु उद्योजकांच्या संघटनेचे संपकऱ्यांना आवाहन

दरम्यान, रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असून आता आवरे गावाच्यापुढे असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व भाजीपाल्याचे पाण्याअभावी नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. भातसा धरण विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. भगदाड पडलेल्या ठिकाणी भरावाचे काम तातडीने करण्यात येणार असल्याचे उपअभियंता ढोकणे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhatsa dam canal damage millions of liters of water entering fields loss to farmers zws