ठाणे : अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उदघाटन आणि राम मुर्ती प्राणपतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भिवंडी शहरात सोमवारी मच्छी, मास विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उदघाटन आणि राम मुर्ती प्राणपतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये श्रीराम दर्शनाचे निमित्य करून महिलेची अडीच लाखाची फसवणूक

या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही समाजाच्या संघटना, पोलीस, शांतता समिती सदस्य, पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. १८ जानेवारी रोजी पोलीस संकुलात ही बैठक पार पडली. यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दोन्ही समाजाला पोलिसांनी महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच या बैठकीनंतर पालिका प्रशासनाने एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. त्यात शहरातील मटण, चिकन आणि मच्छी विक्रीची दुकाने सोमवारी बंद ठेवण्याचे बैठकीत ठरल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Story img Loader