ठाणे : भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला असून तशी घोषणा आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी बुधवारी केली. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सानुग्रह अनुदानाच्या रक्कमेत ९०० रुपयांनी वाढ झाली असून यंदा दिवाळी पूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याचे त्यांनी जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा पालिका कर्मचारी संघटनांनी प्रशासनाकडे १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. या संदर्भात आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी कर्मचारी संघटना प्रतिनिधी व अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आयुक्त म्हसाळ यांनी कर्मचाऱ्यांना ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. यंदा दिवाळी पूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याचे त्यांनी जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले होते. यंदा ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा यंदाच्या सानुग्रह अनुदानात ९०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi municipal corporation employees get 11 thousand rupees on occasion of diwali prd