ठाणे : भिवंडीत मागील काही महिन्यांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढत असून काही भटके श्वान लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत. तर अनेकदा श्वान देखील जखमी होत असतात. या प्रकारानंतर भिवंडी महापालिकेने आता निर्बिजीकरण आणि श्वानांवर उपचार केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दररोज १० ते १५ श्वानांवर उपचार होऊ लागले आहे. तसेच निर्बिजीकरणानंतर श्वानाला ज्या ठिकाणाहून आणले होते, त्याठिकाणी नेऊन सोडले जात आहे असे महापालिकेने स्पष्ट केले.

भिवंडीत काही महिन्यांपूर्वी भटक्या श्वानांच्या हल्ल्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. तसेच मागील काही महिन्यांत भटक्या श्वानांचे नागरिकांवरील हल्ले सातत्याने वाढत होते. भिवंडी शहरात १३ हजाराहून अधिक भटके श्वान आहेत. १२ वर्षांपूर्वी भिवंडी महापालिकेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे केंद्र बंद पडले होते. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वानांच्या हल्ल्याबाबत नागरिकांच्या तक्रारीही वाढत होत्या. तर श्वान देखील विविध कारणांमुळे जखमी होत असतात. श्वानांसाठी निर्बिजीकरण केंद्र तयार करण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून भिवंडी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. परंतु या निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर हैदराबाद येथील एका कंपनीने श्वान निर्बिजीकरण केंद्रास प्रतिसाद मिळाला आहे.

Commercial buildings demolished during cement concrete road widening at Garibacha Pada in Dombivli
डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live News Update: Maharashtra Government Swearing-in Ceremony Live Update
Maharashtra Government Formation : एकनाथ शिंदेंची भेट घेण्याकरता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल!
Ajit Pawar Amit Shah Sunil Tatkare
अमित शाहांनी अजित पवारांची भेट नाकारली? दिल्लीत नेमकं काय घडतंय? तटकरेंनी सगळा घटनाक्रम सांगितला
Kasarwadvali Police, Thane, Kasarwadvali Police Station Electronic items, Kasarwadvali Police Station,
‘फुकट फौजदारां’कडून महागड्या वस्तूंचा वापर, मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश

हेह वाचा…टीएमटीची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई

त्यानुसार, आता भिवंडी येथील इदगाह भागात हे केंद्र उभारण्यात आले आहे. शहरात दररोज भटके श्वान निर्बिजीकरणासाठी आणि जखमी श्वानांना उपचारासाठी केंद्रात नेले जात आहे. या केंद्रात श्वानांवर उपचार झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी आणून सोडले जात आहे. प्रत्येक श्वानाच्या उपचारासाठी कंपनीला एक हजार ४५० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हेह वाचा…स्थानक परिसरात बेकायदा फलकबाजी

श्वानांसाठी निर्बिजीकरण केंद्र १२ वर्षानंतर पुन्हा तयार झाले आहे. या केंद्रामध्ये भटक्या श्वानांवर उपचार देखील केले जात आहेत. निर्बिजीकरण केंद्रामुळे भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. – जयवंत सोनावणे, आरोग्य विभाग प्रमुख, भिवंडी महापालिका.