डोंबिवलीतील भोपर देसलेपाडा गावच्या प्रवेशव्दारावरची कमान उभारणीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू होते. या कमानीसाठी भोपरच्या काही ग्रामस्थांनी रस्ता बंद केला होता. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरुन येजा करावी लागत होती. रस्ते कमान काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला स्थानिक दादागिरी करायचे. त्यामुळे रहिवासी अस्वस्थ होते. ‘लोकसत्ता’ने या कमानीचे वृत्त मंगळवारी प्रसिध्द करताच पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कमानीचे अडथळे दूर करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

भोपर गावत प्रवेश करण्यासाठी ग्रामस्थांनी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पालिका नगररचना विभागाची परवानगी घेऊन काम सुरू केले होते. या कामासाठी कमानीचा रस्ता लाकडी वासे लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हा रस्ता खुला केला जाईल याची रहिवासी वाट पाहत होते. मुख्य रस्ता बंद केल्याने नागरिकांना रोटेक्स कंपनीच्या अरुंद, खड्डेमय रस्त्यावरुन येजा करावी लागत होती. त्यामुळे ज्येष्ठ, विद्यार्थी, नोकरदार यांचे सर्वाधिक हाल होत होते. कामाच्या ठिकाणी, शाळेत पोहचण्यास मुलांना उशीर होत होता.

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे

हेही वाचा : अंबरनाथच्या पोलीस वसाहतींची कोंडी फुटणार ; पोलीस वसाहतींना निधी देण्याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

काही नागरिकांनी कमान बाजुला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना काहींनी दटावले होते. त्यामुळे स्थानिक कमान काढण्यासाठी घाबरत होते. या भागातील काही जागरुक नागरिकांनी याविषयी तक्रारी करताच, ‘लोकसत्ता’ने याविषयी वृत्त प्रकाशित केले. त्याची गंभीर दखल घेत वाहतूक, पालिका अधिकाऱ्यांनी कमानीच्या कामाची पर्वा न करता रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. रस्ता मंगळवारी सकाळी खुला होताच या भागातील शाळा चालक, डाॅक्टर, पालक, नोकरदार यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा : डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधितांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला प्रारंभ

सागाव, देसलेपाडा भागात पाणी टंचाई आहे. या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. मुख्य रस्ता बंद असल्याने टँकरला वळसा घेऊन टंचाई भागात टँकर घेऊन जावे लागत होते. याविषयी स्थानिक कोणीही रहिवासी बोलला तर त्याचा आवाज दाबला जात होता. या कमानीचा एक खांब या रस्त्या लगतच्या एका सोसायटीच्या आवारात सोसायटीची कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आला आहे. याविषयी सोसायटी चालक पालिकेकडे, महसूल विभागाकडे तक्रार करणार आहेत, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.