डोंबिवली येथील पूर्व भागात गेल्या काही महिन्यांपासून सायकल चोरी करणाऱ्या दिवा येथील दोन जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. या आरोपींकडून दीड लाख रुपये किमतीच्या एकूण १३ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>ठाणे : सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

parrot smuggler pune loksatta
पहाडी पोपटांची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Thieves arrested after robbing motorist in Salisbury Park in Pune news
पुणे: सॅलिसबरी पार्कात मोटारचालकाला लुटणारे चोरटे गजाआड
Parade of biker who threw stone at traffic policeman head Hadapsar Pune news
वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या दुचाकीस्वाराची धिंड; हडपसर भागातील घटना
Two wheeler thief arrested from rural area Pune print news
ग्रामीण भागातून दुचाकी चोरणारा गजाआड; वाशिममधील चोरट्याकडून ११ दुचाकी जप्त
akola crime branch arrested inter state gang for breaking shop shutters and stealing goods
आता चोरांची शटर गँग; आंतरराज्य ‘शटर गँग’ अकोल्यात जेरबंद; महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणामध्ये…
cyber crime news in Marathi update
सायबर फसवणूकीप्रकरणी ११ जणांना अटक
pune gun news
पुणे : सराईताकडून पिस्तूल, जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना अटक

हसमितसिंग जसमेरसिंग सैनी (१९) असे अटक आरोपीचे नाव आहे.\डोंबिवली पूर्व भागातील चिपळूणकर रस्ता, आयरे रस्ता परिसरात दररोज सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल होते. एकाच भागात या चोऱ्या होत असल्याने पोलिसांनी या भागातील सोसायट्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रिकरण तपासले. त्यांना दोन जण या सायकल चोरत असल्याचे दिसले. या चोरांचा पोलिसांना चोरीनंतरचा मार्ग तपासला. ते दिवा येथे रात्रीच्या वेळेत जात असल्याचे दिसले.

हेही वाचा >>>ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत; आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप

रात्रीच्या वेळेत पोलिसांनी डोंबिवली-दिवा रस्ते मार्गावर पाळत ठेवली. शनिवारी पहाटे दोन जण डोंबिलीतून दिवाकडे सायकलवरुन जात होते. पोलिसांनी त्यांना हटकले. ते वेगाने पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी डोंबिवलीत सायकल चोरी करत असल्याची कबुली रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सांडभोर यांना दिली. या प्रकरणात एक मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची सुटका करण्यात आली. दुसऱ्याला अटक करण्यात आली.साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, बळवंत भराडे, हवालदार विशाल वाघ, सचिन भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

(रामनगर पोलिसांनी सायकल चोराला अटक केली आहे.)

Story img Loader