अवयवदान जनजागृती व प्रचार करण्यासाठी कार्यरत असलेल्या पुनर्जीवन सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अवयवदान जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या शुभारंभास ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पोलीस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण आणि ठाण्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी महारॅली झाल्यानंतर शनिवारी मासुंदा तलाव, रंगो बापूजी चौक, जांभळी नाका, ठाणे येथे अवयवदान संदर्भात जनजागृती करण्यात येणार असून अवयवदान करण्यास इच्छुकांकडून नोंदणी करून घेण्यात येणार आहे. पुनर्जीवन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विलास ढमाले हे कार्यक्रमाचे आयोजक आहेत. नऊ वर्षांपासून हा उपक्रम असून ठाणे, पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सुमारे ७८ हजार ७८२ अवयवदानाची नोंद झाली आहे.
अवयवदान जागृतीसाठी महारॅली
अवयवदान जनजागृती व प्रचार करण्यासाठी कार्यरत असलेल्या पुनर्जीवन सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अवयवदान जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 12-02-2015 at 12:04 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big rally for awareness of organ donation