डोंबिवली शहराच्या विविध भागात सकाळी, रात्रीच्या वेळेत लूटमार करणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांनी आता वर्दळीच्या फडेक रोडवर शिरकाव केला आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजता फडके रोडने पायी जात असताना एक महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.

हेही वाचा >>>वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाला अटक

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फडके रोडवर वर्दळ असते. आता गर्दीचीही भीती चोरट्यांना राहिली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सांगितले, रेखा केवल आहिर (५८, रा. रामदेवजी सोसायटी, नेहरु रोड, डोंबिवली पूर्व) या शुक्रवारी रात्री अकरा वाजता भोजन झाल्यानंतर पती सोबत फडके रोडवरुन मदन ठाकरे चौकातून वसंत रसवंती गृहा जवळून फिरण्यासाठी चालल्या होत्या. नेहरु मैदानाला वळसा घालून ते घरी येणार होते. फडके रोडवरुन जात असताना रस्त्याच्या उलट मार्गिकेतून एक दुचाकी वेगाने आहिर दाम्पत्याच्या दिशेने आली. त्यांनी दुचाकी स्वारांना पुढे जाण्यासाठी रस्त्याच्या बाजुला उभे राहणे पसंत केले. आहिर दाम्पत्याला काही कळण्याच्या आत दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसलेल्या एका भामट्याने रेखा आहिर यांच्या मानेवर जोराने थाप मारुन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.

हेही वाचा >>>कोपरी पुलाच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक बदल

रेखा यांनी चोरट्याचा हात पकडून त्याला दुचाकीवरुन खाली खेचण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात चोरट्याने रेखा यांच्या चेहऱ्यावर जोराने चापट मारली आणि त्यांना रस्त्यावर ढकलून दिले. त्या बेसावधपणे रस्त्यावर पडल्याने त्यांना मार लागला आहे. रेखा यांच्या पतीने दुचाकी स्वारांचा चोर म्हणून ओरडत पाठलाग केला. चोरटे अप्पा दातार चौकातून गणेश मंदिर दिशेने सुसाट वेगाने पळून गेले.