शहापूरमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचे नवे केंद्र; पुढील आठवडय़ात नागरिकांसाठी खुले

ठाणे जिल्ह्य़ात फार मोठे वनक्षेत्र असले तरी आता बरीचशी जंगले उजाड झाली असून शहरालगतच्या वनजमिनींवर तर अतिक्रमणेही झाली आहेत. जिल्ह्य़ातील उजाड वनजमिनींवर पुन्हा जंगल रुजवण्यासाठी वन विभागाने उपक्रम हाती घेतला असून स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने नवी वने साकारण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यात स्थानिक रहिवाशांच्या मदतीने एक जैवविविधता उद्यान उभारण्यात आले असून पुढील आठवडय़ात ते नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे.

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

शहापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर मुंबई-नाशिक महामार्गालगत साडेबारा हेक्टर जागेत हे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात वन विभागाने विविध प्रकारची फुलझाडे, औषधी वनस्पती, फळझाडांची लागवड केली आहे. पूर्वी ही जागा ओसाड होती. त्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले होते. मात्र आता स्थानिक ग्रामस्थांच्या आवाहनानुसार वन विभागाने या जागेत आता नक्षत्र उद्यान साकारले आहे. त्यामुळे या जागेचे रूप पालटले असून निरनिराळ्या प्रकारांच्या वृक्षसमूहांचा समावेश असलेली उद्याने येथे साकारण्यात आली आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रमिला बागडे आणि वनपाल शांताराम वेहेळे यांनी दिली.

उद्यान असे आहे..

  • नरनिराळ्या प्रकारांच्या वृक्षसमूहांचा समावेश असलेली १२ उद्याने येथे साकारण्यात आली आहेत.
  • या उद्यानांमध्ये चंदन, बेल, आवळा, रिठा, त्रिफळा, नागरमोथा, तीळ आदी ८६ प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
  • आंबा, फणस, जांभूळ, उंबर, मोह, अर्जुन अशा मोठय़ा वृक्षांची लागवडही या जैवविविधता वनात करण्यात आली आहे.
  • निरनिराळ्या प्रकारची फुलझाडेही येथे लावण्यात आली आहेत.
  • प्रत्येक वनस्पतीसमोर तिच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वृक्षांचा परिचय करून घेणे सोयीचे होणार आहे.

विद्यार्थ्यांना उपयोगी

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास सहलींसाठी हे उद्यान उपयोगी ठरणार आहे. या उद्यानात आकर्षक वाटिका तयार केल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणीही आहेत. या उद्यानात कँटिनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आदिवासी संस्कृतीची सचित्र ओळख     

जगातील आदिवासी जाती-जमातींची सचित्र ओळख करून देणारे दालन या जैवविविधता उद्यानात साकारण्यात आले आहे. त्यात विविध संस्कृती आणि रीतिरिवाजांची माहिती मिळणार आहे.

सध्या या उद्यानात एकूण १० हजार ५०० झाडे लावण्यात आली आहेत. टप्प्याटप्प्याने या संपूर्ण जैवविविधता उद्यानाचे व्यवस्थापन पेंडरघोळ ग्रामपंचायतीच्या वन व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केले जाणार आहे. जिल्ह्य़ातील पर्यावरणस्नेही पर्यटनासाठी (इको टुरिझम) हे उद्यान एक चांगला पर्याय ठरणार आहे.

सतीश फाले, विभागीय वनाधिकारी, वनविभाग, ठाणे