Ramdas Kadam criticizes BJP : दापोलीमधील भाजपची मंडळी राक्षसी महत्त्वकांक्षा घेऊन पुढे येत आहेत. २०१९ मध्ये युती असतानाही योगेश कदम यांना त्यांनी मतदान केले नाही. प्रत्येकवेळी योगेश कदम यांना बदनाम करून अडचणीत आणण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला.
शिंदे गटाच्या ठाण्यात खेड-दापोली-मंडणगड येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कदम यांनी भाजपवर आरोप केले. कोकणामध्ये युतीमध्ये कुठेही अडचण नाही. परंतु दापोलीमधील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत ते राक्षसी महत्त्वकांक्षा घेऊन पुढे येत आहेत. २०१९ मध्ये युती असतानाही योगेश कदम यांना त्यांनी मतदान केले नाही. प्रत्येकवेळी योगेश कदम यांना बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्या आहेत. कारण आम्ही विश्वास ठेवत भाजपसोबत आलो आहे. परंतु आमचा विश्वासघात होत आहे अशी टीका कदम यांनी केली.
हेही वाचा – Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला
दापोलीत आमचा आमदार असतानाही भाजप या मतदारसंघावर दावा करत आहेत. हे अशोभनीय आहे. देवेंद्र फडणवीस यामधून निश्चित मार्ग काढतील असे कदम म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही भाजपसोबत आलो. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही. याची जबाबदारी घेण्याचे काम देखील भाजपच्या मंडळींचे आहे. परंतु दापोलीमधील भाजपची मंडळी त्या मताची नाहीत असेही ते म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd